KKR vs GT : ऐकू येत नाही का...; भर मैदानात शुभमन गिल आणि नितिश राणा भिडले!
शुभमन गिलने गेल्या 7 सामन्यामध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या सामन्यात शुभमन गिलच अर्धशतक चुकलं. दरम्यान याचवेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणासोबत गिलने मैदानातच राडा झाला.
KKR vs GT : यंदाच्या आयपीएलमध्ये गतविजेच्या गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) कामगिरी चांगली होताना दिसतेय. सध्या गुजरातची (Gujarat Titans) टीम पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे गुजरात टीमचा ओपनर शुभमन गिल (Shubman Gill) देखील यंदाच्या सिझनमध्ये चांगली कामगिरी करताना दिसतोय. शनिवारी झालेल्या केकेआर (Kolkata Knight Riders) विरूद्धच्या सामन्यात शुभमन गिलचं (Shubman Gill) अर्धशतक हुकलं खरं, मात्र कालच्या सामन्यात गिल आणि केकेआरचा कर्धणार नितिश राणा यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
शुभमन गिलने गेल्या 7 सामन्यामध्ये 3 अर्धशतकं झळकावली आहेत. कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध झालेल्या सामन्यात शुभमन गिलच अर्धशतक चुकलं. दरम्यान याचवेळी केकेआरचा कर्णधार नितीश राणासोबत गिलने मैदानातच राडा झाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे नेमकं प्रकरण काय होतं हे जाणून घेऊया.
गिल आणि राणामध्ये नेमकं काय झालं?
गुजरात टायटन्सच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये ही घटना घडी. यावेळी हर्षित राणा गोलंदाजी करत होता. यावेळी ओव्हरचा चौथा बॉल त्याने गुड लेंथ टाकला, ज्यामुळे गिल यावेळी बीट झाला. हा बॉल गिलच्या फ्रंट पॅडवर लागला आणि केकेआरच्या टीमने एलबीडब्ल्यू अपील केलं.
केकेआरच्या अपीलनंतर अंपायरने मात्र नॉट आऊट करार दिला. पण केकेआरने देखील वेळ न गमावता डीआरएस घेतला. यावेळी रिप्लेमध्ये बॉल बॅटच्या कडेला लागून पॅडवर लागल्याचं दिसून आलं. याचाच अर्थ गिल त्यावेळी नॉट आऊट होता. याचवेळी राणा आणि गिल यांच्यामध्ये वाजलं.
नॉट आऊट करार दिल्यानंतर राणा गिलच्या कानात काहीचरी सांगताना स्पॉट झाला. दरम्यान या दोघांमध्येही मस्करीच्या मूडमध्ये हे भांडण झाल्याचं कॅमेरामध्ये दिसून येतंय. मात्र या सर्व प्रकारानंतर शुभमन त्याचं अर्धशतक मात्र पूर्ण करू शकला नाही.
गुजरातचा 7 विकेट्सने विजय
पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताने 180 रन्सचं गुजरातला लक्ष्य दिलं होतं. तर गुजरातने 3 विकेट्स गडी गमावून टार्गेट पूर्ण केलं आणि सामना जिंकला. या सामन्यात गुजरातच्या विजय शंकरने नाबाद 51 आणि शुभमन गिलने 49 रन्स केले. या विजयासह गुजरातची टीम पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचलीये.