Shubman Gill Birthday Sachin Tendulkar Post: भारताचा स्फोटक फलंदाज शुभमन गिलने शुक्रवारी आपला 24 वा वाढदिवस साजरा केला. भारताच्या यंदाच्या विश्वचषक संघामधील सर्वात तरुण खेळाडू असलेल्या शुभमन गिलला अनेक आजी माजी खेळाडूंनी सोशल नेटवर्किंगवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर शुभमनच्या वाढदिवसासंदर्भातील ट्रेण्डही चांगलेच व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, शुभमनच्या वाढदिवसानिमित्त भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर काय म्हणतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर वाढदिवस संपण्यासाठी 6 तासांहून कमी वेळ शिल्लक असताना सचिनने शुक्रवारी सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन म्हणजेच ट्वीटर अकाऊंटवरुन शुभमनसाठी एक पोस्ट केली. या पोस्टमधील 2 शब्दांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


अनेकांनी दिल्या शुभेच्छा पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलला अनेक सेलिब्रिटी सोशल नेटवर्किंगवरुन शुभेच्छा दिल्या. माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने शुभमनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आगामी वर्षात तुला भरपूर धावा करता येवोत असं म्हटलं. तर युवराज सिंगनेही शुभमनला शुभेच्छा देताना विश्वचषक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. युवराजनेही तुला खूप साऱ्या धावा करता येवोत असं पोस्टमध्ये म्हटलं. चेतेश्वर पुजारा. दिनेश कार्तिक यांनीही शुभमनला शुभेच्छा दिल्या. हरभजन सिंगनेही शुभनला शुभेच्छा दिल्या. मात्र सचिन तेंडुलकरने दिलेल्या शुभेच्छांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या.


सचिन काय म्हणाला?


सचिन तेंडुलकरने ट्वीटरवरुन, "वाढदिसवाच्या शुभेच्छा शुभमन! आगामी वर्ष तुला भरपूर साऱ्या धावांचं जावो आणि अनेक छान आठवणी तयार करण्याची संधी मिळो," असं शुभमनला टॅग करत म्हटलं. 



लोकांनी काढला वेगळाच अर्थ


तसं इतर क्रिकेटपटूंप्रमाणे सचिनचंही ट्वीट फार साधं आणि सरळ आहे. मात्र अनेकांनी याचा ट्वीटवरुन उलट सुलट अर्थ काढत प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुभमन यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर अनेकदा चर्चा असते. यावरुनच अनेकांनी शुभमनला सासऱ्यांनी शुभेच्छा दिल्याचं म्हटलं आहे. काहींनी थेट देवानेच शुभमनला शुभेच्छा दिल्याचं म्हटलं आहे. एवढ्या उशीरा पोस्ट केल्याबद्दल एकाने देर आऐ दुरुस्त आऐ म्हणत कमेंट केली आहे. 



त्या 2 शब्दांचा अर्थ काय?


काहींना सचिनच्या ट्वीटमधील शेवटच्या 2 शब्दांबद्दल प्रश्न पडला आहे. ग्रेट मेमरीज म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे सचिनला असा प्रश्न एकाने विचारला आहे. अन्य एकाने साराने सचिनच्या अकाऊंटवरुन ट्वीट केल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे. अन्य एकाने अशाप्रकारेच चर्चा पुढे घेऊन जातात असं म्हटलं आहे. सुभाष नावाच्या एका व्यक्तीने सासरे एवढा मान देत असताना धावा करणार नाही असा कोण आहे? असं म्हटलं आहे.



अनेकांनी शेअर केले मिम्स


काहींनी मिम्सच्या या ट्वीटखाली कमेंटमध्ये पोस्ट केले आहेत.



सचिनच्या या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असल्याचं दिसत आहे, हेच खरं!