नवी दिल्ली : न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने आतापर्यंत उत्कृष्ट प्रदर्शन दाखवलं आहे. अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमने विजयी घोडदौड कायम राखत सेमीफायनल गाठली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंडर-१९ क्रिकेट वर्ल्डकप खेळणाऱ्या भारतीय टीममधील शुभमन गिल याने आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन दाखवत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. 


Caption

पंजाबच्या या बॅट्समनने केलेल्या तुफानी बॅटिंगमुळे सर्वांचचं लक्ष त्याच्याकडे केंद्रीत झालं आहे. वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत जितक्या मॅचेसमध्ये शुभमन गिल खेळला आहे त्या सर्व मॅचेसमध्ये त्याने हाफ सेंच्युरीपेक्षा कमी स्कोअर केला नाहीये. 


यामुळेच युथ वन-डे मध्ये शुभमन गिल हा एकटा बॅट्समन बनला आहे ज्याने १,०००हून अधिक रन्सच्या स्कोअरमध्ये आपला अॅव्हरेज १०० हून अधिक ठेवला आहे.


हे पण पाहा: INDvsSA: विराट कोहलीने धोनी-गावस्करचा 'हा' रेकॉर्ड मोडला


ब्रॅडमन यांनाही टाकलं मागे


शुभमन गिल याने आता डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकलं आहे. डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या टेस्ट करिअरमध्ये ९९.९४ च्या सरासरीने रन्स केले आहेत. त्यांच्या या सरासरीचा रेकॉर्ड कुणीही मोडला नाही. मात्र, शुभमन गिल हा एकमेव बॅट्समन आहे ज्याने १००० हून अधिक रन्स बनवत युथ वनडेमध्ये आपला स्कोअर १०१.६० केला आहे.


शुभमन गिल याने १३ युथ वनडेच्या १३ इनिंग्समध्ये १००० रन्स पूर्ण केले आहेत. यापूर्वी टेस्ट मॅचेसच्या १३ इनिंग्समध्ये हजार रन्स पूर्ण करण्याचा रेकॉर्ड डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर होता. तर त्यापूर्वी एवरटन विक्सने १२ इनिंग्समध्ये हजार रन्स पूर्ण केले होते.


Image: ICC

संपूर्ण टूर्नामेंटमध्ये शुभमन गिलचीच चर्चा


पहिल्याच मॅचमध्ये शुभमन गिलने ऑस्ट्रेलिया विरोधात ५४ बॉल्समध्ये ६३ रन्सची इनिंग खेळली. ही मॅच टीम इंडियाने १०० रन्सने जिंकली. त्यानंतर दुसऱ्या मॅचमध्ये शुभमन गिलला संधी मिळाली नाही.


तर, तिसऱ्या मॅचमध्ये शुभमनने ९० रन्सची तुफानी इनिंग खेळली. यासोबतच बांगलादेशविरोधात खेळताना शुभमनने ९४ बॉल्समध्ये ८६ रन्सची इनिंग खेळली आणि त्यामुळे भारताने सेमीफायनल सहज गाठली.