Shubman Gill Mistake In CSK vs GT Toss: आयपीएलच्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली असून 7 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स (Chennai Super Kings vs Gujarat Titans) यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यात 63 रन्सने चेन्नईच्या टीमने गुजरात टायटन्सचा धुव्वा उडवला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सला या सिझनमध्ये पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी टॉसच्या वेळी नवा कर्णधार गिलकडून एक मोठी चूक झाली. शुभमन गिलच्या या चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने याआधी स्पर्धेत मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला. पण हा सामना सुरू होण्यापूर्वी टॉस सुरू असताना शुभमन गिलने चूक केली का? टॉस जिंकल्यानंतर गिलने चुकीचा निर्णय घेतला का? नेमकं त्यावेळी काय घडलं हे जाणून घेऊया


टॉसनंतर निर्णय घेताना चुकला शुभमन गिल


चेन्नई विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये गिलने टॉस जिंकल्यानंतर चुकीचा निर्णय घेतल्याचं दिसतंय. तर झालं असं की,  टॉससाठी चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणं उडवलं. यावेळी शुभमनने कॉल देऊन टॉस जिंकला. यावेळी गिलने प्रथम फलंदाजी करणार असल्याचं सांगितले, परंतु त्याला आपण चुकीचं बोलल्याचं लक्षात आलं आणि दुसऱ्याच क्षणी त्याने आपला निर्णय बदलला. गिलने लगेच प्रथम गोलंदाजी करणार असल्याचं स्पष्ट केलं.



टॉसचा हा व्हिडिओ आयपीएलच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये गिल थोडा गोंधळलेला दिसला. चुकीचा निर्णय घेतल्यानंतर गिलला देखील हसू आवरलं नाही. त्यानंतर बोलता बोलता गिलने शेवटच्या क्षणी तो बॉलिंग करणार असल्याची पुष्टी केली. यावर विरोधी कर्णधार ऋतुराज गायकवाड देखील हसू लागला.


चेन्नईकडून गुजरातचा पराभव


 चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स (CSK vs GT) यांच्यात आयपीएलचा 7 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात ऋतुराजच्या (Ruturaj Gaikwad) स्मार्ट कॅप्टन्सीमुळे चेन्नईने दुसरा विजय नोंदवला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या गुजरातला कॅप्टन शुभमन गिलचा निर्णय भारी पडला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत 207 रन्सचं गुजरातला जिंकण्याचं आव्हान दिलं. हे आव्हार पार करताना सुरूवात चांगली झाली. कॅप्टन शुभमन गिल आणि वृद्धीमान सहा यांनी पहिल्या 3 ओव्हरमध्ये 28 रन्स केले. मात्र, शुभमन बाद झाल्यावर गुजरातच्या टीमला चांगला खेळ करता आला नाही. गुजरातची टीम अडचणीत असताना डेव्हिड मिलरला डाव सावरता आला नाही. अखेर 63 रन्सने सामना जिंकत चेन्नईने सिझनमधील दुसरा विजय मिळवला आहे.