मुंबई: क्रिकेट स्टार्स सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांचे सर्व अपडेट्स ते चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. IPL मधील कोलकाता संघाचा आणि टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल देखील सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करत असतो. इन्स्टाग्रामवर शुभमन गिलने एक फोटो शेअर केला. त्यावर कॅप्शन देताना त्याने प्रेमात पडू नये असं म्हटलं आहे. त्यावर सोशल मीडियावर चाहत्यांनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक युझरने तर चक्क शुभमन गिलला त्याचं ब्रेकअप झालं का? असा थेट प्रश्न विचारला आहे. शुभमन गिलने यावर दिलेलं उत्तर तर त्या पेक्षाही भन्नाट आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहेत. मात्र यासंदर्भात कोणीच अधिकृत बोललं नाही. आता युझरने विचारलेल्या प्रश्नानंतर मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला असं म्हणायला हरकत नाही. 


शुभमनने चाहत्यांना उत्तर देताना म्हटलं आहे की, अरे हा, मी सध्या सिंगल आहे.  याचा मी सध्या विचार करत नाही आणि भविष्यात करेन असं वाटत नाही. आताही याबाबत योजना नाही. आता शुभमनने फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ' Sigma rule no.1’  शुभमन गिलचा हा नियम त्याच्या टी-शर्टवर लिहिलेला आहे. गिलच्या टी-शर्टवर लिहिले आहे - 'परीच्या प्रेमात पडू नकोस.'



शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं नाव जोडलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एक युझरने तर फक्त साराच्या प्रेमात पडायचं, अशी कमेंट केली आहे. शुभमनचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.