Shubman Gill Health Update WC 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिलला ( Shubman Gill ) काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. यामुळे वर्ल्डकपच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये त्याचा समावेस करण्यात आला नव्हता. 2 दिवसांपूर्वी शुभमनला चेन्नईच्या रूग्णालयात देखील दाखल केलं गेलं होतं. त्यानंतर त्याला लगेच डिस्चार्ज देण्यात आला असून शुभमन ( Shubman Gill ) आता बरा होत असल्याची माहिती आहे. अशातच आता पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळणार का? याबाबत मोठी अपडेट समोर येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गिलला ( Shubman Gill ) अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापासून दूर राहावं लागलं होतं. डेंग्यूच्या तापातून बरा होत असलेला शुभमन गिल बुधवारी अहमदाबादला पोहोचला आहे. मात्र तो वर्ल्डकपमधील सामन्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. 


भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "गिलची प्रकृती चांगली असून अहमदाबादला पोहोचला आहे. त्याची तब्येत पूर्वीपेक्षा उत्तम असून पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात तो खेळणार की नाही याची खात्री नाही." दरम्यान शुभमन गुरुवारी मोटेराच्या सराव सत्रात भाग घेणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


डेंग्यूची लागण झाल्यामुळे शुभमन गिल ( Shubman Gill ) वर्ल्डकपमधील पहिले दोन सामने खेळू शकला नव्हता. गेल्या आठवड्यात त्यांच्या प्लेटलेट्स 70,000 पर्यंत कमी झाल्याची माहिती होती. त्याला चेन्नईच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, 24 तासांनंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.


पाकिस्तान विरूद्ध खेळणार का शुभमन गिल?


क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, शुभमन बुधवारी रात्री चेन्नईहून अहमदाबादला पोहोचला, तर टीम इंडियाचे इतर खेळाडू गुरुवारी दुपारी या ठिकाणी पोहोचणार आहेत. चांगली बातमी म्हणजे गिल रिकव्हर होत असून तो पूर्णपणे फीट असल्यास त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकणार आहे. त्याची प्रकृती सुधारणं ही टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी आहे. 


टीम इंडियाचे सलग 2 विजय


बुधवारी अफगाणिस्तान विरूद्ध टीम इंडिया यांच्यात सामना रंगला होता. 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात 8 विकेट्सने टीम इंडियाचा विजय झाला. तर 2023 च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. त्याने हा सामना 6 विकेटने जिंकला. सलग 2 सामने जिंकून टीम इंडियाने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान पटकावलं आहे.