Valentine day : Hardik Pandya चा नादचं खुळा, एका मुलाचा बाप झाल्यानंतर आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार, `या` ठिकाणी होणार शाही विवाह सोहळा
Hardik Natasha marriage : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी राजस्थानमध्ये लग्न केल्यानंतर सेलिब्रिटींना पुन्हा लग्न करायची इच्छा होतंय का? कारण एका मुलाचा बाप झाल्यानंतर Hardik Pandya पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे.
Hardik Pandya & Natasa Stankovic to re-marry on Valentine’s day : अरे देवा Hardik Pandya ला झालं तरी काय? एका मुलाचा बाप झाल्यानंतर आता पुन्हा लग्नबंधनात अडकणार आहे. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविचने (Natasa Stankovic) 3 वर्षांपूर्वी कोर्टात लग्न केलं होतं. आता इतक्या वर्षानंतर हे जोडप पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार आहे. के एल राहुल (KL Rahul) आणि आथिया शेट्टीनंतर (Athiya Shetty) कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांनी सातफेरे घेतले. लग्नाचे सगळे विधी संगीत, हळदी आणि विवाह सोहळा...म्हणून की काय हार्दिक आणि नताशाला पुन्हा एकदा लगीनघाई (hardik natasha marriage) झाली आहे का?
इथे होणार विवाहसोहळा
भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच 14 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये पुन्हा लग्न करणार आहेत. हार्दिक आणि नताशा एकमेकांना खूप दिवसांपासून एकमेकांना ओळखतात. जानेवारी 2020 मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली. यानंतर मे 2020 मध्ये दोघांनी जवळच्या लोकांमध्येच लग्न केलं. तेव्हापासून दोघांच्या मनात ग्रँड लग्न होणार असल्याची चर्चा होती.
पण साखरपुड्यानंतर त्यांनी पालक होणार असल्याची घोषणा केली आणि त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं. जुलै 2020 मध्ये त्यांना मुलगा झाला. हार्दिकने ट्विटरवर लहान मुलाची बोटे धरलेला एक फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. आता इतक्या वर्षांनंतर ते आपलं स्वप्न पूर्ण करणार आहेत. नताशा अनेकदा तिच्या इंस्टाग्रामवर हार्दिक आणि मुलासोबतचे फोटो शेअर करत असते.
नताशाचा जन्म सर्बियामध्ये झाला असून ती लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. तिने 2012 मध्ये 'सत्याग्रह' चित्रपटातील 'हमारी उतरिया' या आयटम नंबरद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नताशा बिग बॉस सीझन-8 मध्येही सहभागी झाली होती . याशिवाय ती 'नच बलिये सीझन 9' चा देखील भाग घेतला होता. रॅपर बादशाहसोबतच्या 'डीजे वाले बाबू'नंतर नताशाला खूप लोकप्रियता मिळाली . त्याशिवाय ती 'फुक्रे रिटर्न्स' मध्येही दिसली होती.
हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) न्यूझीलंडच्या टी-20 सिरीजमध्ये अतिशय चांगली कर्णधारपदाची (Captain Hardik Pandya) जबाबदारी सांभाळली होती. या सिरीजमध्ये पंड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी आपली कमाल दाखवली. पण यावेळी त्यांनी आपण जोपर्यंत फिट होणार नाही तोपर्यंत टेस्ट मॅचमध्ये ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं होतं.