`...अन् मला जीवे मारण्याची धमकी आली`, विराटवर बोलताना दिनेश कार्तिकसमोर खळबळजनक खुलासा
Simon Doull Death Threats : न्यूझीलंडचे समालोचक सायमन डौलला विराट कोहलीच्या चाहत्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
Simon Doull On Virat Kohli : यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दमदार विजय मिळवला अन् तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली. यंदाच्या आयपीएलमध्ये देखील आरसीबीला (RCB) विजय मिळवता आला नाहीये. चांगली लय मिळाली असताना राजस्थान रॉयल्सने विराटच्या संघाचा पराभव केला. त्यामुळे अनेक चाहत्यांचा हिरमोड झाला होता. आरसीबीचा स्टार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) याने निवृत्ती घेतलीये. मात्र, त्याने अद्याप याची अधिकृत घोषणा केली नाही. नुकतंच दिनेश कार्तिकने एक मुलाखत दिली. न्यूझीलंडचे समालोचक सायमन डौलने (Simon Doull) डीकेची मुलाखत घेतली. मुलाखतीत बोलताना सायमन डौलने खळबळजनक खुलासा केला आहे.
Simon Doull ने काय म्हटलं?
विराट कोहली इतका चांगला खेळाडू आहे की, तो आऊट होईल की नाही याची काळजी करू नये, तो खूप चांगला खेळाडू आहे आणि मी नेहमीच त्याच्याबद्दल चांगलंच बोललोय. मी विराट कोहलीबद्दल हजारो चांगल्या गोष्टी बोलल्या आहेत, पण जर मी एक गोष्ट बोलली जी थोडीशी नकारात्मक असू शकते किंवा नकारात्मक मानली जाऊ शकते, त्यामुळे मला जीवे मारण्याच्या धमक्या येतात, असा धक्कादायक खुलासा सायमन डौलने केला आहे. सायमन डौलने केलेल्या खुलाशानंर दिनेश कार्तिकने नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर अशा प्रकारची निंदा करणं चुकीचं आहे, असं मत दिनेश कार्तिकने मांडलं.
दिनेश कार्तिकने या मुलाखतीत बोलताना विराट कोहलीवर देखील भाष्य केलं. जेव्हा जेव्हा मी आरसीबीच्या विरोधात खेळत होतो, तेव्हा माझा कॅच पकडल्यावर विराट कोहली नेहमी बेन स्टोक्सची आठवण काढायचा. सेलिब्रेशन करण्याची त्याची तशी पद्धत आहे, असं डीके म्हणतो. मला त्याचं कधीच वाटलं नाही. हार्दिक पांड्या देखील मी फलंदाजीला आल्यावर स्टेजिंग करायचा. हा बघा लेग स्पिनर आला, असं म्हणत तो माझी खिल्ली उडवायचा. पण हे सर्व मस्करी व्हायचं आणि मी त्याची मजा घेयचो, असंही दिनेश कार्तिकने यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकने बंगळुरूसाठी चांगली फिनिशरची भूमिका बजावली होती. या हंगामात रोहित शर्माने देखील दिनेश कार्तिकला डिवचलं होतं. मुंबईविरुद्ध दिनेश कार्तिकने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार आणि षटकाराची छडी लावली होती. त्यावेळी याला वर्ल्ड कप खेळायचाय, असं म्हणत रोहित शर्माने दिनेश कार्तिकची शाळा घेतली होती. त्याचा व्हिडीओ देखील समोर आला होता.