IND vs NZ: लज्जास्पद! कॉमेंट्रेटरला करावं लागतंय `हे` काम; भारत न्यूझीलंड सामन्यात असं काय घडलं?
Simon Doull on Sky Stadium: सामना न झाल्यानं अनेकजण नाराज असतानाच (IND vs NZ 1st T20) आता समालोचक साइमन डुल ट्विट करत व्यवस्थापकांवर कडाडून टीका केली आहे.
Ind Vs Nz 1st T20: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-ट्वेंटी सिरीज (India vs New Zealand) खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना (IND vs NZ 1st T20) वेलिंग्टन येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र, हा सामना पावसामुळे वाहून गेला. टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. (Simon Doull terms preparations at Sky Stadium embarrassing)
भारताच्या यंगिस्तानचा हा पहिला सामना असल्याने प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. मात्र, पावसामुळे टॉस (Match Abandoned Without Toss Due to Rain) देखील होऊ शकला नाही. अखेर धो धो पावसामुळे मॅच रद्द करण्यात आली. सामना न झाल्यानं अनेकजण नाराज असतानाच आता समालोचक साइमन डुल (Simon Doull) ट्विट करत व्यवस्थापकांवर कडाडून टीका केली आहे.
आणखी वाचा - Team India: Rohit Sharma ने टी-20 चं कर्णधारपद का सोडलं पाहिजे? 3 प्रमुख कारणं समोर
नेमकं काय झालं?
समालोचक सायमन डुल यांनी ट्विटरवर स्टेडियमच्या (Sky Stadium) अस्वच्छ जागांचे फोटो शेअर करून आपली नाराजी व्यक्त केली. आम्हालाच सर्व जागा साफ कराव्या लागतात, असं डुल म्हणाले. त्यानंतर आता न्यूझीलंड क्रिकेट बोर्डावर (New Zealand Cricket Board) टीका होताना दिसते.
पाहा ट्विट -
काय आहे Simon Doull चं ट्विट?
या स्टेडियमवर खेळण्याचं आणखी एक उत्तम कारण आहे. आमच्या परदेशी पाहुण्यांना बसता यावं म्हणून मी स्वतः कॉमेंट्री बॉक्समधील (I cleaned all the seats in commentary area) सर्व जागा साफ केल्या आहेत. किती दयनीय जागा आहे. लज्जास्पद, न्यूझीलंडमध्ये आपले स्वागत आहे, असं म्हणत त्याने टोमणा देखील मारला.