नवी दिल्ली : इंडोनेशियाशी राजधानी जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धा 2018 मध्ये भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधुचा फायनलमध्ये पराभव झाला आहे. चीनच्या ताई जू यिंगकडून तिचा फायनलमध्ये पराभव झाला. 


सिंधुचा पराभव झाला असला तरी तिने एक इतिहास रचला आहे. भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात पी.व्ही सिंधु आशियाई स्पर्धेत रौप्य पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.