Indian Team Playing 11 vs AFG: वर्ल्डकपमध्ये सुपर 8 च्या सामन्यांना सुरुवात झाली असून आज भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. बारबाडोसच्या केंसिंग्टन ओवल मैदानात हा सामना होणार आहे. टीम इंडियाने या सामन्यासाठी चांगली तयारी केली असून प्लेईंग 11 कशी असणार आहे, असा सवाल सर्वांच्या मनात आहे. टीम इंडियात या सामन्यासाठी बदल होण्याची शक्यता अधिक आहे. जाणून घेऊया अफगाणिस्तान विरूद्धच्या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असणार आहे. 


कशी असू टीम इंडियाची प्लेईंग 11


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुपर 8 च्या टप्प्यामध्ये टीम इंडिया आदज पहिला सामना अफगाणिस्तानशी रंगणार आहे. या सामन्यात बदल होण्याची शक्यता अधिक आहे. टीममध्ये हे बदल मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांच्या रूपात होण्याची शक्यता आहे. लीग स्टेजमधील सुरुवातीचे 3 सामने न्यूयॉर्कमध्ये खेळवले गेले. तर चौथा सामना फ्लोरिडामध्ये होता मात्र तो पावसामुळे खेळवता आला नाही. न्यू यॉर्कमध्ये टीम इंडियाने तीन मुख्य वेगवान गोलंदाजांसह हार्दिक पांड्याचा वापर केला होता. ज्यामुळे टीम इंडियाला 4 वेगवान गोलंदाजीचे पर्याय मिळाले होते.


कुलदीप यादवचा होणार प्लेईंग 11 मध्ये समावेश?


आता सुपर-8 चे सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. या ठिकाणी स्पिनर्सच्या अनुषंगाने चांगली पीच असल्याचं म्हणलं जातंय. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात स्पिन गोलंदाजी मजबूत करण्यासाठी रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमध्ये कुलदीप यादवचा समावेश करू शकतो. यावेळी मोहम्मद सिराजच्या जागी कुलदीपचा समावेश केला जाऊ शकतो. 


कुलदीपचा टीममध्ये समावेश केल्यास टीम इंडियाकडे 3 स्पिन पर्याय उपलब्ध असणार आहेत. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांनी पहिले तीन सामने खेळले आहेत. हार्दिक पांड्यासोबत टीमकडे 3 वेगवान गोलंदाजीचे पर्यायही असणार आहे. अशा प्रकारे, प्लेइंग इलेव्हनमधील बदलांमुळे टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमात कोणताही फरक पडणार नाहीये.


कशी असेल अफगाणिस्तानविरूद्ध संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जड़ेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.