दुबई : आशिया कप 2022 (Asia Cup 2022) चा अंतिम सामना आज (11 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यातील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. सामन्याच्या अर्धा तास आधी टॉस होणार आहे. या टॉस आधीच आशिया कपचा चॅम्पियन कोण होणार हे जवळपास निश्चित होणार आहे. जाणून घ्या कसं ते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुबईत झालेल्या अनेक सामने पाहिल्यास असे दिसेल की, टॉस जिंकणारा संघच बॉस आहे. टॉस जिंकणारा संघ प्रथम बॉलिंग निवडतो आणि नंतर सहज सामना जिंकतो. गेल्या 22 सामन्यांमध्ये 19 वेळा प्रथम बॉलिंग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे.अशा परिस्थितीत, हे स्पष्ट होत आहे की,  सामन्याच्या पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच आशिया चषक 2022 ची ट्रॉफी कोणता संघ उंचावणार आहे, हे जवळपास निश्चित होणार आहे.


पिच रिपोर्ट
दुबईच्या खेळपट्टीवर नेहमीप्रमाणे प्रथम ब़ॉलिंग करणारा संघ फायद्यात असेल. येथे वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला स्विंग मिळू शकते. फिरकीपटूंनाही चांगला स्विंग मिळण्याची शक्यता आहे. ही विकेट दुसऱ्या डावात फलंदाजांना उपयुक्त ठरेल. सध्या, रात्री येथे दव फारसा प्रभाव पडत नाही, त्यामुळे गोलंदाजी संघाला नंतर फारसा त्रास होत नाही. पण असे असूनही, या विकेटवर पाठलाग करणाऱ्या संघाला बहुतांश प्रसंगी सहज विजय मिळाला आहे.


हेड टू हेड सामने 
आतापर्यंत टी-20 फॉरमॅटमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात पाकिस्तान संघाने वर्चस्व राखले आहे. दोन्ही देशांदरम्यान झालेल्या 22 टी-20 सामन्यांमध्ये 13 सामने पाकिस्तानने जिंकले आहेत, तर 9 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. मात्र, गेल्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला होता. आशिया चषकाच्या सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात श्रीलंकेने तीन षटके शिल्लक असताना पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला.


फायनलमध्ये 3 वेळा आमने सामने
आशिया कपमध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका (PAK vs SL) यांच्यात तीन वेळा फायनल झाली आहे. यामध्ये श्रीलंकेच्या संघाने दोनदा, तर पाकिस्तानने एकदा विजय मिळवला आहे. 2014 मध्ये दोघांमध्ये शेवटची आशिया कप फायनल झाली होती, जिथे श्रीलंकेने बाजी मारली होती. एकूण आशिया चषक ट्रॉफीबद्दल बोलायचे तर श्रीलंका 5 वेळा चॅम्पियन बनला आहे, तर पाकिस्तानने ही ट्रॉफी दोनदा जिंकली आहे.


दरम्यान आता आशिया कपवर (Asia Cup 2022) कोणता संघ नाव कोरतो हे आता सामन्याच्या निकालानंतरच कळणार आहे. त्यामुळे आता कोणता संघ आशिया कपवर नाव कोरतो याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.