IND vs AUS Womens 2nd ODI : टीम इंडियाची महिला ब्रिगेड आणि ऑस्ट्रेलिया वुमन्स (IND W vs AUS W) टीम यांच्यात दुसरा वनडे सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रिलिया संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलिया संघाने 50 ओव्हरमध्ये 258 धावांचा डोंगर उभारला. त्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने दमदार सुरूवात केली आहे. टीम इंडियाकडून स्पिनर दीप्ती शर्माने (Deepti Sharma) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. त्यामुळे तगड्या ऑस्ट्रेलियाला रोखणं शक्य झालं. अशातच या सामन्यात धक्कादायक घटना घडली. (Sneh Rana collision with Pooja Vastrakar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय झालं?


ऑस्ट्रेलियाचा डाव सुरू असताना 25 व्या षटकात ही घटना घडली. ऑस्ट्रेलियन फलंदाज बेथ मुनीने शॉट लगावला. त्यावेळी बॅकबर्ड पॉईंटवर हा शॉट थांबवण्यासाठी पूजा वस्त्राकर (Pooja Vastrakar) आणि स्नेह राणा (Sneh Rana) एकमेकांकडे न पाहता धावल्या. यावेळी या दोघंचं डोकं आदळलं. या दुर्घटनेनंतर दोघीही जमिनीवर पडून राहिल्या. पुजा वस्त्रकार थोड्या वेळात उठून उभा राहिली, पण स्नेह राणा डोकं धरून जमिनीवर पडून राहिलेली दिसली. दोन्ही खेळाडूंना आधी आईस पॅक देण्यात आलं पण काही वेळातच स्नेह राणाने मैदान सोडलं. 


BCCI ने दिली माहिती


ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करताना स्नेह राणाने डोकेदुखीची तक्रार केली होती. तिला स्कॅनसाठी नेण्यात आले असून, सध्या सुरू असलेल्या वनडेमध्ये ती सहभागी होणार नाही. हरलीन देओल पर्याय म्हणून नाव देण्यात आले आहे, अशी माहिती बीसीसीआयने (BCCI) दिली आहे.


पाहा Video



भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), दीप्ती शर्मा, रिचा घोष (डब्ल्यू), स्नेह राणा, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, श्रेयंका पाटील, रेणुका ठाकूर सिंग.


ऑस्ट्रेलिया महिला (प्लेइंग इलेव्हन): अॅलिसा हिली (W/C), फोबी लिचफिल्ड, एलिस पेरी, बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशले गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेअरहम, अलाना किंग, किम गर्थ, डार्सी ब्राउन.