...म्हणून वर्ल्डकप जिंकल्यावर कांगारू शूजमधून प्यायले बीअर!
वर्ल्डकपच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपले शूट उतरवले. या शूजमध्ये बीअर ओतली आणि त्या शूजमधून बीअर प्यायले.
दुबई : टी-20 वर्ल्डकपचा खिताब ऑस्ट्रेलियाने रविवारी आपल्या नावावर केला. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यानंत या विजयाची झिंग ऑस्ट्रेलिय़ाच्या खेळाडूंना चढल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे मैदानात ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. तर दुसरीकडे ड्रेसिंग रूममध्ये आल्यानंतर खेळाडूंनी आनंदाच्या भरात जे केलं ते पाहून तर अनेकांना धक्काच बसला.
वर्ल्डकपच्या विजयाचं सेलिब्रेशन करताना ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी आपले शूट उतरवले. या शूजमध्ये बीअर ओतली आणि त्या शूजमधून बीअर प्यायले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ आयसीसीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र कांगारूच्या खेळाडूंनी असं का केलं हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.
आता हा व्हिडीओ पाहून अनेक चाहतेही विचारणा करतायत की ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शूजमधून दारू का प्यायली? त्यांनी असा विचित्र पद्धतीने विजय का साजरा केला?
ऑस्ट्रेलियामध्ये शूजमधून वाईन पिण्याची प्रथा आहे, जी ऑस्ट्रेलियामध्ये खूप प्रसिद्ध आहे. 20व्या शतकापासून ऑस्ट्रेलियामध्ये अशा प्रकारे आनंद साजरा केला जातो. ऑस्ट्रेलियाचा MotoGP रायडर जॅक मिलरने 2016 मध्ये त्याचा पहिला प्रीमियर विजय साजरा केला. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फॉर्म्युला ड्रायव्हर्स आणि इतर खेळाडूंनी उत्साहात विजय साजरा करण्यास सुरुवात केली.
ही प्रथा शूए नावानेही ओळखली जाते. ऑस्ट्रेलियामध्ये हे खूप लोकप्रिय आहे. यामध्ये मद्यपान करणारा एकतर त्याचे शूज वापरतो किंवा त्याने नॉमिनेट केलेल्या एखाद्याचे बूट वापरतो. यामध्ये आधी बुटावर दारू ओतली जाते, नंतर बुटाच्या आत टाकली जाते आणि नंतर तिचं सेवन केलं जातं.