सौरव गांगुलींचा मास्टर स्ट्रोक, रवि शास्त्रीला दिले सडेतोड उत्तर
टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपला मास्टर स्टोक खेळताना कोच रवि शास्त्रीला सडेतोड उत्तर दिले आहे.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपला मास्टर स्टोक खेळताना कोच रवि शास्त्रीला सडेतोड उत्तर दिले आहे.
रवि शास्त्री यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना सांगितले होते, की विराट कोहलीची टीम इतिहासातील सर्वात चांगली टीम आहे. ही टीम सर्व विक्रम तोडण्याचे सामर्थ्य ठेवते. जे काम मोठे नावं असलेली टीम इंडिया करू शकली नाही, ते सध्याच्या टीमने करून दाखवले.
याला उत्तर देताना गांगुलीने शाल जोडीतील दिले आहे. यात शास्त्री यांना केवळ उत्तर दिले नाही तर मागील दिवसांची आठवण करून दिली.
भारतीय टीमने श्रीलंकेत २० वर्षात पहिल्यांदा २०१५ मध्ये सिरीज विजय मिळवला होता. पण मोठ्या खेळाडूंच्या उपस्थितीत टीम इंडिया श्रीलंकेला श्रीलंकेत पराभूत करू शकली नाही. पण कोहलीच्या कप्तानीत भारताने २०१५मध्ये हे करून दाखवले होते.
गांगुलीने इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, इमानदारीने सांगतो मला या विषयावर जास्त काही बोलायचे नाही. त्यांना शुभेच्छा त्यांना २०१९ पर्यंत वर्ल्ड कपची जबाबदारी मिळाली आहे. मला आशा आहे की कप मिळवूनच ते आपली जबाबदारी पार पाडतील.
यावर गांगुली अजून म्हणाला की, तुम्ही विसरत आहात की माझ्या नेतृत्त्वाखाली १५ वर्षांनंतर पाकिस्तानला त्यांच्या जमीनीवर नमवले होते. आम्ही इंग्लंडला २००७ मध्ये पराभूत केले होते. मी काही तुलना करणार नाही. टीमने चांगले खेळावे, हे मला पाहायचे आहे. मला आशा आहे की टीम चांगली कामगिरी करेल.