सौरव गांगुलीची प्रकृती स्थिर, करोना चाचणी निगेटिव्ह
सौरव गांगुलीला कोलकाताच्या वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सौरव गांगुलीला कोलकाताच्या वुडलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सौरव गांगुलीवर अँजिओप्लास्टी करण्यात आली. ती यशस्वी झाली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याचप्रमाणे सौरव गांगुलीची करोना चाचणीही करण्यात आली आसून चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आहे आहेत.
दरम्यान शनिवारी जिममध्ये व्यायाम करत असताना गांगुलीच्या डोळ्यासमोर अचानक अंधार आला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता गांगुलीची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे.
माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला शुक्रवारी 1 जानेवारी रोजी छातीत दुखत असल्याच्या कारणाने रुग्णालयात दाखल केलं गेलं. सध्या गांगुलीची प्रकृती सुधारत आहे आणि डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.