मुंबई : 'तारक मेहता.....' या सब टीव्हीवरील मालिकेतील सारीच पात्र प्रसिद्ध आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पोपटलाल' या अवलिया पत्रकाराची भूमिकादेखील रसिकांना खूप आवडते. पण भारतीय क्रिकेट संघामध्येदेखील एक 'पोपट' आहे, हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 
 ZEE न्यूजशी बातचीत करताना आशीष नेहराने हे गुपित उघडलं आहे. हा भारतीय संघातील पोपट दुसरा तिसरा कोणी नसून चक्क 'आशीष नेहरा'च  आहे.  
 
 क्रिकेटच्या चाहत्यांप्रमाणेच भारतीय संघातील खेळाडू आशीष नेहराला मिस करतात. नेहरापेक्षा कोणीही लहान, मोठा खेळाडू असला तरीही त्याला हाक' नेहराजी' अशीच मारली जात असे. पण यासोबत आशीषला 'पोपट' अशी हाक मारली जात असे. 
 
 का म्हणतात आशीष नेहराला 'पोपट' ? 
 
 भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने आशीषला 'पोपट' हे नाव ठेवले आहे. कारण आशीष हा भारतीय संघातील खूप बडबड करणारा खेळाडू होता. अनेकदा त्याला थांबवणं कठीण होत असे. पाण्यात बुडवले तरीही तो बोलत असे.  


 आशीष बोलला नाही तरीही त्याची बॉडी लॅग्न्वेज इतकी मजेशीर असायची की अनेक खेळाडू हसून लोटपोट होत असे.