`आता बीसीसीआयचं भवितव्य...`, रॉजर बिन्नींची नियुक्ती झाल्यावर `दादा`चं मोठं वक्तव्य!
रॉजर बिन्नींच्या निवडीनंतर सौरव गांगुलीने सोडलं मौन म्हणाला...
Sourav Ganguly on Rojar Binny : बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरन माजी खेळाडू सौरव गांगुलीला हटवण्यात आलं. त्यानंतर त्याच्या जागी 1983 च्या वर्ल्ड कपचे शिलेदार रॉजर बिन्नी यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र सौरव गांगुलीला पदावरून हटवल्यामुळे मोठा वादंग झाला. अशातच यावर रॉजर बिन्नी यांच्या नियुक्तीवर सौरव गांगुलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sourav Gangulys big statement after Roger Binny's appointment as BCCI President)
रॉजर बिन्नी यांचं हार्दिक अभिनंदन करतो, निवडलेली नवीन समिती गोष्टी पुढे नेण्यासाठी काम करेल. बीसीसीआय आता चांगल्या लोकांच्या हाती आहे. भारतीय क्रिकेटही चांगल्या प्रकारे पुढे जात असल्याचं सौरव गांगुली म्हणाला. त्यासोबतच दादाने भारतीय संघालाही शुभेच्छा दिल्या.
बीसीसीआयच्या नव्या समितीमध्ये, जय शहा सचिव म्हणून काम पाहणार आहेत. भाजपचे आमदार असलेले आशिष शेलार यांची बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजीव शुक्ला उपाध्यक्ष तर देवजित सैकिया सहसचिव असतील. अरुण धूमल यांची आयपीएलच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सौरव गांगुली आता पून्हा एकदा CAB ची निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुलीच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या. सौरव गांगुली आणि अमित शहा यांच्या मुलाला तीन वर्षांची मुदत देण्यात आली होती. पण मला आश्चर्य वाटतं की अमित शहांच्या मुलाचा कार्यकाळ संपला नाही आणि सौरवचा कार्यकाळ संपला. मला अमित शहा यांच्या मुलाशी कोणतीही अडचण नाही पण सौरवला का काढलं? त्याच्यावर अन्याय झाला असल्याचं ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या.