India Vs South Africa 2nd T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना गकेबरहा येथे खेळवला गेला. या सामन्यात साऊथ अफ्रिकेने टीम इंडियाचा धुव्वा उडवला आहे. पाच गडी राखून साऊथ अफ्रिकेने विजय मिळवला असून मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी 180 धावा उभ्या गेल्या होत्या. मात्र, पावसामुळे साऊथ अफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं आव्हान मिळालं होतं. त्यांनी 7 बॉल बाकी असताना आव्हान पूर्ण केलं. (South Africa Beat India In 2nd T20I By 5 wickets)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसामुळे टीम इंडियाला अखेरचे तीन बॉल खेळता आले नाही. पाऊस थांबल्यानंतर थेट साऊथ अफ्रिकेच्या डावाची सुरूवात झाली अन् त्यांना 15 ओव्हरमध्ये 152 धावा करायच्या होत्या. साऊथ अफ्रिकेने तगडी सुरूवात केली. मॅथ्यू ब्रीट्जके आणि रीजा हेंड्रिक्स यांनी पहिल्या दोन ओव्हरमध्येच 40 धावा कुटल्या. ब्रीट्जके बाद झाल्यानंतर मार्करमने 16 बॉलमध्ये 30 धावांची धुंवाधार खेळी केली. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि एंडिले फेहलुकवायो यांनी फिनिशिंग टच दिला अन् सामना 5 विकेट्सने खिशात घातला आहे.


दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम (Aiden Markram) याने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. मार्करम याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल दोघंही शुन्यावर बाद झाले. तर तिलक वर्मा 29 धावा करत डावाला सुरूवात करून दिली. मात्र, तो बाद झाल्यानंतर टीम इंडियाला कॅप्टन सूर्याने सावरलं. सूर्याने आणि रिंकूने (Rinku Singh) आक्रमण करत साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांना फोडून काढलं. दोघांनी 10 चा रनरेट खाली पडून दिला नाही. सूर्या बाद झाल्यावर रिंकूने मोर्चा सांभाळला अन् टीम इंडियाला 180 धावांवर पोहोचवलं. रिंकू सिंह याने 39 बॉलमध्ये 68 धावा केल्या आहेत. तर सूर्यकुमार यादवने 56 धावांची खेळी केली. साऊथ अफ्रिकेकडून गेराल्ड कोएत्जी याने 3 गडी बाद केले.


SA vs IND : सूर्यकुमार बाद होताच Tabraiz Shamsi चं खास सेलिब्रेशन; बुट काढून कोणाला लावला फोन?


टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.


दक्षिण आफ्रिका : एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.