मुंबई :  टी 20 वर्ल्ड कपचं (T20 World Cup 2022) काउंटडाऊन सुरु झालंय.  टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचे 2 स्टार खेळाडू दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडले आहेत. जसप्रीत बुमराह आणि ऑलराउंडर रवींद्र जाडेजा यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळता येणार नाहीये. यानंतर आता आणखी एक खेळाडू अष्टपैलू खेळाडूला दुखापतीमुळे वर्ल्ड कपला मुकणार आहे. (south africa dwaine pretorius ruled out of 3match odi series against india and proceeding icc t20 world cup due to a fracture of his left thumb) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेचा ऑलराउंडर  ड्वेन प्रिटोरियस (Dwayne Pretorius) दुखापतीमुळे टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिका आणि टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. प्रिटोरियसला डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.


प्रिटोरियसने आतापर्यंत 30 टी-20 सामने खेळले आहेत.  ज्यामध्ये त्याने 261 धावा करताना 8.29 च्या इकॉनॉमीने 35 विकेट घेतल्या आहेत. ड्वेन प्रिटोरियसने 3 कसोटी सामने आणि 27 एकदिवसीय सामनेही खेळले आहेत. त्याने कसोटी सामन्यात 7 आणि एकदिवसीय सामन्यात 35 विकेट्स घेतल्या आहेत.



टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम साउथ आफ्रिका : टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्तजे, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, रेली रोसो, तबरेज शम्सी आणि ट्रिस्टन स्टब्स.