मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) दक्षिण आफ्रिका टीम जून महिन्यात भारत (South Africa tour India 2022) दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात आफ्रिका टीम इंडिया (Team India) विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या दौऱ्याआधी बीसीसीआयने क्रिकेट चाहत्यांना मोठी गूड न्यूज दिली आहे. (south africa tour of india 2022 ind vs sa t20i series bcci allows full capicity crowds in stadium source)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने स्टेडियममध्ये पूर्ण म्हणजेच 100 टक्के क्षमतेने चाहत्यांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. कोरोनाच्या काळात चाहत्यांशिवाय सामने खेळवण्यात आले. मात्र त्यानंतर कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर 25 त्यानंतर 50 टक्के चाहत्यांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेसाठी क्रिकेट चाहत्यांना स्टेडियममध्ये पूर्ण क्षमतेने प्रवेश दिला जाणार आहे. बीसीसीआयने आधीच आयपीएल प्लेऑफसाठी 100 टक्के चाहत्यांना उपस्थितीची परवानगी दिली होती. कोरोनाचा ओसरलेला जोर पाहता हा निर्णय घेण्यात आला होता.  


टी 20 मालिकेचं वेळापत्रक


      मॅच                         तारीख                  ठिकाण
पहिला सामना                  9 जून                  दिल्ली
दुसरा सामना                 12 जून                  कटक
तिसरी मॅच                    14 जून                  वायझॅग
चौथा सामना                  17 जून                 राजकोट
पाचवी मॅच                    19 जून                 बंगळुरु


टी 20 सीरीजसाठी टीम दक्षिण आफ्रिका


टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.