T20 World Cup South Africa Will Won Says David Miller: दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेत भारताने 2-0 ने (India Vs South Africa) आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे. मात्र असं असलं तरी दक्षिण आफ्रिकन संघाने भारतीय संघाला चांगलीच लढत दिली. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 8 गडी गमवून 106 धावा केल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने 2 गडी गमवून पूर्ण केलं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने 237 धावांचं आव्हान दिलं होतं. दक्षिण आफ्रिकन संघाला 20 षटकात 221 धावा करता आल्या आणि 16 धावांनी पराभव झाला. पण या सामन्यात डेविड मिलरची (David Miller) बॅट चांगलीच तळपली. 47 चेंडूत नाबाद 106 धावा केल्या. पराभवानंतर डेविड मिलरनं T20 वर्ल्डकपबाबत केलेलं भाकीत चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताविरुद्ध सीरिज गमवल्याने टी 20 वर्ल्डकपवर कोणताही फरक पडणार असं डेविड मिलर याने सांगितलं आहे. यासाठी मिलरने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचं उदाहरण दिलं. "ऑस्ट्रेलिया संघ 2021 मध्ये कठीण काळातून गेला होता. मात्र शेवटी वर्ल्डकपवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलिया सलग 5 टी 20 सीरिज गमवून मैदानात उतरली होती. म्हणून मला असं वाटतं याबाबत चिंता करण्याची गरज नाही", असं डेविड मिलरनं सांगितलं. 


IND Vs SA T20: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानात घुसला साप, पळापळ झाल्याचा Video Viral


"आम्ही मागच्या दीड वर्षात चांगली टीम बनवली आहे. आम्ही एकत्रितपणे चांगली कामगिरी केली आहे. तसेच मोठी भागीदारी देखील केली आहे.", असंही डेविड मिलरने पुढे सांगितलं.