केप टाऊन: सोशल मीडियावर सध्या दोन महिला क्रिकेटपटूंच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगली आहे. होय, आम्ही सांगतो आहोत दक्षिण अफ्रिकेच्या क्रिकेट संघाची कर्णधार डेन वान निकार्क आणि वेगवान गोलंदाज, ऑलराऊंडर क्रेकेटपटू मेर जेन काप्प यांच्याबद्धल. दोघीही क्रिकेटपटू असून, नुकताच त्यांनी विवाह केला आणि आयुष्यभर एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या. शनिवारी पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात दोघींनी आयुष्यभराचा जोडीदार म्हणून एकमेकींना स्वीकारले.


आप्तेष्टांसोबत जल्लोष


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

युनायटेड किंगडम येथे टी-२० आणि एकदिवसीय सामना खेळून अफ्रिकेला परतल्यावर दोन्ही क्रिकेटपटूंनी आपले जवळचे मित्र, नातेवाईक आणि परिवारातील सदस्यांसोबत जल्लोष साजरा केला. काप्प हिने तर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या अनोख्या विवाहाची छायाचित्रेही पोस्ट केली आहेत. दोन्ही क्रिकेटपटूंना एकत्र पाहून त्यांचे चाहतेही भलतेच खूश आहेत.



वान 'वुमेन क्रिकेटर ऑफ द ईयर'ने सन्मानीत


 सन १९९३मध्ये प्रिटोरिया येथे जन्मलेल्या डेन वान हिने एक टेस्ट, ९५ एकदिवसीय सामने आणि ६८ टी-२० सामन्यांमध्ये दक्षिण अफ्रीकेचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने ९५ एकदिवसीय सामन्यात वानने ३३.३९च्या सरासरीने सुमारे १७७० धावा केल्या आहेत. यात वानच्या ७ अर्धशतकांचाही समावेश आहे. तिने ओडीआयमध्ये १२५ विकेट्सही घेतल्या आहेत. वान हिला २०१७-१८चा 'वुमेन क्रिकेटर ऑफ द ईयर' हा पुरस्कार देऊनही गौरविण्यात आले आहे. वानने टी-२० सामन्यांमध्ये २८.८० च्या सरासरीने १४६९ धावा ठोकल्या आहेत. त्यात ९ अर्धशतकांचा समावेश आहे.



काप्प भारताविरूद्ध एकच सामना खेळली


दुसऱ्या बाजूला काप्पबद्दल बोलायचे तर, तिनेही १ टेस्ट, ९३ एकदिवसीय आणि ६२ टी-२० सामन्यांमध्ये दक्षिण अफ्रीकेचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने एकदिवसीय सामन्यांमध्ये आणि टी-२० सामन्यांमध्ये अनुक्रमे १६१८ आणि ६०० धावा केल्या आहेत. वान हिने २००९मध्ये पदार्पण केले होते. तिने पहिला सामना ८ मार्च २००९ रोजी वेस्ट इंडीजविरूद्ध खेळला होता. तिच्या एकूण कारकीर्दीतील भारताविरूद्धचा एकमेव सामना तिने २०१४मध्ये खेळला होता. याशिवाय काप्पनेही आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००९मध्ये डेब्यू केला होता. तिने १० मार्च २०१९मध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळला होता.