केप टाऊन : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. ६ मॅचच्या या सीरिजमध्ये भारत २-०नं पुढे आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानामध्ये पहिल्यांदाच ३ वनडे मॅच जिंकून आघाडी घ्यायची संधी भारताला आहे. या मॅचमध्ये भारतीय टीममध्ये कोणतेही बदल नाहीत. आम्ही टॉस जिंकलो असतो तरी पहिले बॅटिंगच घेतली असती, अशी प्रतिक्रिया विराट कोहलीनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेच्या टीमला मात्र दुखापतीनं ग्रासलं आहे. एबी डिव्हिलियर्स, फॅप डुप्लेसीस आणि क्विटंन डीकॉक दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. फॅप डुप्लेसिसच्या अनुपस्थितीमध्ये एडन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे.


भारतीय टीम : रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह


लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा