पहिली टी-20 : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, भारतीय टीममध्ये बदल

पहिल्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला आहे.
जोहान्सबर्ग : भारताविरुद्धच्या पहिल्या टी-20मध्ये दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला आहे. दुखापतीमुळे एबी डिव्हिलियर्स ही मॅच खेळू शकणार नाही. तर भारतानंही टीममध्ये बदल केले आहेत. शेवटची वनडे खेळलेला कुलदीप यादवला संधी देण्यात आलेली नाही. तर सुरेश रैना, मनिष पांडे आणि जयदेव उनाडकटनं टीममध्ये कमबॅक केलं आहे.
अशी आहे भारतीय टीम
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, एम.एस.धोनी, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह
टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं पराभव झाला तर वनडे सीरिजमध्ये कोहलीच्या टीमनं इतिहास घडवत सीरिज ५-१नं जिंकली. २६ वर्षांमध्ये कोणत्याही भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेत वनडे सीरिज जिंकता आली नाही. यानंतर आता ३ टी-20 मॅचची सीरिज जिंकण्यासाठी भारतीय टीम मैदानात उतरेल.