बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला २० ओव्हरमध्ये १३४/९ पर्यंतच मजल मारता आली. शिखर धवनने सर्वाधिक ३६ रनची खेळी केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. फोर्टुईन आणि हेन्ड्रिक्सला प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तबरेझ शम्सीला १ विकेट घेण्यात यश आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने ठेवलेलं १३५ रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेने फक्त १ विकेट गमावून आणि १६.५ ओव्हरमध्येच पूर्ण केलं. कर्णधार क्विंटन डिकॉकने ५२ बॉलमध्ये नाबाद ७९ रनची खेळी केली. रिझा हेन्ड्रिक्स २८ रनवर आऊट झाला आणि टेंबा बऊमा २७ रनवर नाबाद राहिला. भारताकडून फक्त हार्दिक पांड्याला १ विकेट मिळाली.


३ टी-२० मॅचच्या या सीरिजची धर्मशालामध्ये झालेली पहिली मॅच पावसामुळे रद्द झाली होती. यानंतर मोहालीमध्ये झालेल्या दुसऱ्या मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला होता. तिसरी मॅच गमावल्यामुळे ही टी-२० सीरिज बरोबरीत सुटली आहे. क्विंटन डिकॉकला मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.