मुंबई : आशिया कपची सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. प्रत्येक देश त्यांचा त्यांचा क्रिकेट संघ जाहीर करण्यात व्यस्त आहे. या दरम्यानच क्रिकेट वर्तुळातून दु:खद बातमी समोर आली आहे. त्यामुळे अनेक भारतीय खेळाडू सध्या श्रद्धांजली वाहताना दिसत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिकेचे  73 वर्षीय माजी पंच रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen) यांचे अपघाती निधन झाल्याची घटना घडलीय.कोर्टझेन यांच्यासह अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंर क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली आहे.  
 
स्थानिक वृत्तानुसार, रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen Death) केपटाऊनहून नेल्सन मंडेला बे येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान ते जात असलेल्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला धडक बसली. रिव्हर्सडेल नावाच्या परिसरात मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. कोर्टझेन व्यतिरिक्त या अपघातात आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. 


नेमके कोण होते ? 
रुडी कोर्टझेन (Rudi Koertzen Death) हे जगातील सर्वोत्तम पंचांपैकी एक मानले जातात. आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये त्यांचा अनेक वर्षांपासून समावेश होता. रुडी यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.


विरेंद्र सेहवागची श्रद्धांजली
रुडी (Rudi Koertzen Death) यांच्या निधनावर वीरेंद्र सेहवागने (Virendra sehwag) एक भावनिक ट्विट केले आहे. सेहवागने लिहिले की, रुडी कोर्टझेनच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. त्याच्याशी खूप चांगले संबंध होते. मी जेंव्हा जोरात फटके मारायचो तेंव्हा ते मला टोमणे मारायचे की हुशारीने खेळ, मला तुझी फलंदाजी बघायची आहे, असे तो म्हणाला.  


सेहवाग पुढे म्हणाला, 'एकदा त्याला त्याच्या मुलासाठी खास ब्रँडचे क्रिकेट पॅड घ्यायचे होते. त्याने मला याबद्दल विचारले. मी त्याला भेट म्हणून एक पॅड दिला, ज्याचा त्याला खूप आनंद झाला. एक सज्जन आणि अतिशय अद्भुत व्यक्ती. रुडी तुझी आठवण येईल,असे शेवटी सेहवाग (Virendra sehwag) म्हणाला आहे.  


रेकॉर्ड
रुडी कोर्टझेनने (Rudi Koertzen) 331 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावली आहे. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 108 वेळा आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 209 वेळा कामगिरी बजावली आहे. त्याचवेळी त्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 14 सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावली. एवढेच नाही तर रुडी कोर्टझेनने महिलांच्या टी-२० सामन्यात अंपायरिंग जबाबदारी पार पाडली आहे. 



दरम्यान सध्या रुडी कोर्टझेनच्या (Rudi Koertzen) निधनानंतर त्यांना क्रिकेट विश्वातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.