Sports News : आगामी T-20 विश्वचषकासाठी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) संघाची घोषणा केली आहे. जोस बटलरकडे संघाचं कर्णधारपद देण्यात आलं आहे. मात्र निवड समितीने इंग्लंडच्या दोन स्टार खेळाडूला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जेसन रॉय आणि एलेक्स हेल्स यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलामीवीर जेसन रॉयलाही संघात संधी मिळालेली नाही. इंग्लंडने फिल सॉल्टला पसंती दिली आहे. सॉल्टने या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. T20 विश्वचषक-2021 पासून जेसन रॉय या फॉरमॅटमध्ये केवळ 11 सामने खेळला आहे. यामध्ये त्याने 18.72 च्या सरासरीने एकूण 206 धावा केल्या आहेत. 


इंग्लंडने एलेक्स हेल्सला संघाबाहेर ठेवलं आहे. हेल्सने 2011 मध्ये भारताविरुद्ध मँचेस्टरमध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. T-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये इंग्लंडकडून शतक झळकावणारा तो पहिला फलंदाज आहे. 2005 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर एका षटकात 55 धावा झोडल्या होत्या. क्रिकेट आयडॉल T-20 स्पर्धेदरम्यान त्याने षटकात 8 षटकार आणि 1 चौकार लगावले होते. त्या ओव्हरमध्ये 3 नो बॉल होते.


इंग्लंडच्या संघात अशा 3 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे ज्यांनी वर्षभर टी-20 खेळला नाही. त्यापैकी बेन स्टोक्स, मार्क वुड आणि ख्रिस वोक्स हे या वर्षी T20 सामने देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेले नाहीत. जोस बटलरने आयपीएल (IPL-2022) च्या शेवटच्या हंगामात दमदार कामगिरी केली होती.


बटलरने आयपीएलच्या मागील मोसमातही अप्रतिम कामगिरी करताना 4 शतके झळकावली होती. मॉर्गनच्या निवृत्तीनंतर बटलरकडे इंग्लंडच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांचे कर्णधारपद देण्यात आलं आहे.


टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम कॅरेन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपले, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड