नवी दिल्ली : स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकलेला टीम इंडियाचा माजी खेळाडू एस. श्रीसंतनं आता आणखी एक मोठा खुलासा केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआय स्पॉट फिक्सिंग प्रकरणात नाव असलेल्या १३ खेळाडुंना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचं आणि आपल्याविरुद्ध कट रचत असल्याचं म्हटलंय. श्रीसंतच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एक नवीन वाद उभा राहिलाय. 


'बीसीसीआय ज्या खेळाडुंची पाठराखण करत आहे त्यातील ५-६ खेळाडू आत्ताही आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहेत. मला आठवतंय की मुदगल समितीच्या अहवालात या १३ खेळाडूंच्या नावांचा उल्लेख होता... परंतु, बीसीसीआयनं या नावांना सार्वजनिक न करण्याची विनंती केली होती... कारण यामुळे भारतीय क्रिकेटला नुकसान होऊ शकतं' असंही श्रीसंतनं म्हटलंय. 


'परंतु, मला या प्रकरणात गोवण्यात आलं... त्यामुळे मला तिहारच्या तुरुंगातही राहावं लागलं... मला त्या १३ जणांची नावं जाणण्याचीही इच्छा नाही... किंवा मी त्यांच्या नावांचा खुलासाही करणार नाही... स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मी आणि माझ्या कुटुंबानं मोठं दु:ख झेललंय... माझ्या राज्यालाही मोठा अपमान सहन करावा लागलाय. मी ज्या परिस्थितीतून गेलोय त्या परिस्थितीतून कुणीही जाऊ नये अशी मी प्रार्थना करतोय...' असंही श्रीसंतनं म्हटलंय.