मुंबई : गुजरात विरुद्ध हैदराबाद सामना सोमवारी खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान हैदराबाद टीमला एक मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू राहुल त्रिपाठीला दुखापत झाली. त्याने फिल्डिंग करताना खूप उत्तम प्रकारे कॅच घेतला होता. बॅटिंग करताना तो अचानक खाली कोसळला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल त्रिपाठीचं टीममबाहेर जाणं हे धोक्याचं होऊ शकतं. हैदाराबाद टीममध्ये त्याचं मोठं योगदान आहे. हैदराबादच्या 14 व्या ओव्हरमध्ये राहुल त्रिपाठी बॅटिंग करत होता. त्यावेळी राहुल तेवतिया बॉलिंग करत होता. राहुलने सिक्स ठोकला आणि खाली कोसळला. 


दुखापतीमुळे राहुल विव्हळत होता तो खाली कोसळला आणि त्याला दुखापत सहन होत नव्हती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.   
राहुल त्रिपाठीला पाहण्यासाठी मैदानात फिजिओ थेअरपिस्ट आले. दुखापत एवढी जास्त होती की राहुलला मैदान सोडवं लागलं. 


राहुल त्रिपाठी पुढच्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही. राहुलची दुखापत जास्त गंभीर नसावी असा अंदाज आहे. तो लवकर बरा व्हावा यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.