SRH vs RR: सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात अवघ्या 1 रनने राजस्थान रॉयल्सचा पराभव झाला आहे. प्रथम खेळताना सनरायझर्स हैदराबादने नितीश रेड्डी आणि ट्रॅव्हिस हेडच्या अर्धशतकांच्या जोरावर 201 रन्स केले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. यावेळी टीमचा स्टार ओपनर जॉस बटलर शून्यावर आऊट झाल्याने टीमची स्थिती आणखीन बिघडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांच्यातील 133 रन्सच्या पार्टनरशिपमुळे राजस्थानला विजयाच्या जवळ आणलं होतं. मात्र तरीही टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यशस्वी जयस्वालने 40 चेंडूत 67 रन्स केले. त्याच्या या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. रियान परागने 49 चेंडूत 77 रन्सने शानदार खेळी खेळली, ज्यात त्याने 8 चौकार आणि 4 षटकार ठोकले.


राजस्थानने 2 विकेट्स लवकर गमावल्या


2 विकेट्स लवकर गमावून देखील राजस्थान रॉयल्सने पॉवरप्ले ओव्हर्समध्ये 2 गडी गमावून 60 रन्स केले होते. 14व्या ओव्हरमध्ये टी नटराजनच्या बॉलवर 67 रन्स काढून जयस्वाल बाद झाला. पण पराग अजूनही क्रीजवर उभा होता. राजस्थानची धावसंख्या 15 ओव्हरमध्ये 157 रन्स अशी होती. यावेळी राजस्थानला शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये 45 रन्सची गरज होती. 16व्या ओव्हर रियान परागही बाद झाला, त्यामुळे सामना अजूनच खडतर झाला. SRH ला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 20 रन्स हवे होते. यावेळी अजून 5 विकेट बाकी होते. प्रथम शिमरॉन हेटमायर आणि नंतर ध्रुव जुरेल यांच्या विकेट पडताच सामन्याचं चित्र पालटलं.


शेवटच्या ओव्हरमध्ये कशी जिंकली हैदराबाद


राजस्थानला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल्समध्ये 13 रन्सची गरज होती. रोव्हमन पॉवेल आणि आर अश्विन क्रिजवर फलंदाजी करत होते. 


  • पहिला बॉल- अश्विनने एक रन घेत पॉवेलला स्ट्राईक दिली.

  • दुसरा बॉल- पॉवेलने 2 रन्स काढले

  • तिसरा बॉल- पॉवेलने चौकार लगावला

  • चौथा बॉल- वेगाने धावून 2 रन्स काढले

  • पाचवा बॉल- 2 धावा काढल्या. मात्र दुखापतीमुळे सामना काही काळ थांबवावा लागला.

  • सहावा बॉल : शेवटच्या बॉलवर विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची गरज होती. भुवनेश्वरने फुल टॉस टाकला जो थेट रोव्हमन पॉवेलच्या पॅडवर गेला. रिप्लेमध्ये तो एलबीडब्ल्यू झाल्याचे दिसून आले. अखेर भुवनेश्वर कुमारने सामना जिंकवून दिला.