मुंबई : अनपेक्षितरित्या सर्वांनाच धक्का देत श्रीलंका (Sri lanka Cricket Team) संघाने आशिया कप (Asia Cup) स्पर्धेत बाजी मारली. भारत आणि पाकिस्तानसारख्या भल्या भल्या संघांचा एकजुटीने सामना करत श्रीलंकेने सहावेळा आशिया कप जिंकण्याची किमया केली. अशातच आता T20 World Cup साठी श्रीलंका संघाची घोषणा करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका संघ T20 World Cup मध्ये चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झालाय. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आज विश्वचषकासाठी संघ जाहीर केला. यावेळी संघात दोन धडाकेबाज खेळाडूची एन्ट्री झाली. 


दोन खेळाडूंची घरवापसी


T20 World Cup साठी दुष्मंथा चमिरा आणि लाहिरू कुमारा या दोन खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलंय. चमिरा आणि कुमारा या दोघांना दुखापतग्रस्त असल्याने आशिया कप स्पर्धेला मुकावं लागलं होतं. मात्र, आता दोघांचा संघात समावेश करण्यात आला आहे. असं असलं तरी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या मालिकेतील प्रदर्शन आणि फिटनेसवर त्यांचा सहभाग अवलंबून असणार आहे.


अशेन बंडारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चांडीमल, बिनुरा फर्नांडो आणि नुवानीडु फर्नांडो, या 5 खेळाडूंना राखीव म्हणून संघात घेण्यात आलं आहे. कुसल मेंडिस आणि पथुम निसांका या दोन खेळाडूंच्या निवडीबाबत शंका व्यक्त केली जात होती. मात्र, निवड समितीने या दोघांवर पुन्हा विश्वास दाखवला.


Team India : टीम इंडियाचा ऑलराऊंडर सामन्यादरम्यान जबर जखमी; मैदानात बोलवली Ambulance


T20 World Cup साठी श्रीलंका संघ- 


दासुन शनाका (कर्णधार), दानुष्का गुणाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिन्दु हसरंगा, महेश थीक्षाना, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लाहिरू कुमारा, दिलशान मदुशंका आणि प्रमोद मदुशन.


राखीव खेळाडू - अशेन बंडारा, प्रवीण जयविक्रमा, दिनेश चांडीमल, बिनुरा फर्नांडो आणि नुवानीडु फर्नांडो.