मुंबई : मुशफिकर रहीमच्या ७२ धावांच्या दमदार खेळीमुळे निदहास ट्रॉफी स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला ५ विकेटनी हरवले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यातील पराभवासोबतच श्रीलंकेच्या नावे खराब रेकॉर्डची नोंद झाली. तर दुसरीकडे बांगलादेशने विजय मिळवत नवा इतिहास रचला. 


पहिल्यांदा फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २१४ धावांची खेळी केली होती. यानंतर बांगलादेशच्या संघाने ५ विकेट गमावत हे आव्हान पूर्ण केले. 


या सामन्यातील पराभवासोबतच श्रीलंकेने पराभवाचा नवा रेकॉर्ड केला. श्रीलंकेचा टी-२० फॉरमॅटमधील हा ५०वा पराभव आहे. या सामन्याआधी बांगलादेश आणि श्रीलंका दोघांच्याही नावावर ४९-४९ पराभवांची नोंद होती. आता ५० सामन्यात पराभव सहन करणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेने पहिले स्थान मिळवलेय.


बांगलादेशने या सामन्यात २१५ धावांचे आव्हान पूर्ण करत आशियामध्ये नवा रेकॉर्ड केलाय. टी-२०मध्ये इतके मोठे आव्हान पूर्ण करणारा बांगलादेश पहिला संघ ठरलाय. आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्यापही एकाही आशिया देशाला हे जमले नव्हते.