Afghanistan vs Sri Lanka : आशिया कपमधील सहावा सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (SL vs AFG) यांच्यात खेळवला गेला. धाकधूक वाढणाऱ्या या सामन्यात श्रीलंकेने दणदणीत विजय मिळवला आहे. श्रीलंकेने अफगाणिस्तानला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं होतं. अफगाणिस्तानला सामना जिंकून सुपर-4 साठी क्वालिफाय करायचं असेल तर 37.1 ओव्हरमध्ये टार्गेट पूर्ण करायचं होतं. अखेरच्या 7 बॉलमध्ये अफगाणिस्तानला 15 धावांची गरज होती आणि अफगाणिस्तानकडे 2 विकेट शिल्लक होत्या. मात्र, श्रीलंकेने फिरकीची जादू दाखवली अन् दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे श्रीलंकेला विजय मिळवत सुपर-4 मध्ये क्वालिफाय करता आलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेला प्रत्युत्तर देताना अफगाणिस्तानची सुरूवात अतिशय खराब झाली. रहमत शाह आणि हशमतुल्ला शाहिदी यांनी डाव सांभाळला अन् सामना हातातून जातोय असं वाटत असताना मैदानात आला मोहम्मद नबी. नबीने 32 बॉलमध्ये 62 धावांची वादळी खेळी केली. नबीने सामन्यात पुन्हा जीव आणला अन् अफगाणिस्तानच्या आशा पुन्हा जिवंत झाल्या. त्यानंतर राशीद खानच्या खांद्यावर मोठी जबाबदारी होती. मात्र, डेथ प्लेयर्सच्या विकेट गेल्याने राशीद हतबल झाला. अफगाणिस्तानच्या 276 धावांवर 8 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर राशीदला करामत दाखवता आली नाही आणि श्रीलंकेने अफगाणिस्ताची वाद रोखली अन् सुपर-4 मध्ये दणक्यात एन्ट्री मिळवली आहे.



टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर पाथुम निसांका आणि दिमुथ करुणारत्ने यांनी दणक्यात सुरूवात करून दिली. पहिले दहा ओव्हर दोघांनी खेळून काढले. त्यात त्यांनी 63 धावांची भागेदारी केली. त्यानंतर कुसल मेंडिसने धावांचा पाऊस पाडला. मेंडिसने आवल्या डावात 6 चौकार आणि 3 अप्रतिम षटकार मारून 109.52 च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. त्यानंतर असलंकाने 36 धावा अन् वेललागेने 33 धावा करत श्रीलंकेचा स्कोर 250 पार केला. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावत 291 धावांचं टार्गेट श्रीलंकेला दिलं. त्यामुळे आता अफगाणिस्तानची धाकधूक वाढली होती.


दरम्यान, श्रीलंकेने दिलेल्या 292 धावांचं आव्हान पार करताना मोहम्मद नबीने ज्याप्रकारे खेळी केली, ती पाहून अनेकांच्या अंगात उत्साह संचारला. मात्र, दासुन शनाकाने मैदानाची परिस्थिती ओळखली अन् फास्टरऐवजी फिरकीपटूंना अखेरच्या दोन ओव्हर करण्यासाठी बोलवलं. धनंजया डी सिल्वा श्रीलंकेसाठी गेमचेंजर ठरला.


Asia Cup मधील सुपर 4 चं चित्र स्पष्ट, असा रंगणार 6 सामन्यांचा थरार; पाहा IND vs PAK कधी?


अफगाणिस्तान संघ : रहमानउल्ला गुरबाज (wk), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (c), नजीबुल्लाह झदरन, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, करीम जनात, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.


श्रीलंकाचा संघ : पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (wk), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दासुन शनाका (क), दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, कसुन राजिथा, मथीशा पाथिराना.