श्रीलंकेची टीम २९४ रनवर ऑलआऊट
भारत-श्रीलंका यांच्यात कोलकाता येथे सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये चौथ्या दिवशी श्रीलंकेची पहिली इनिंग 294 रनवर ऑलआऊट झाली आहे.
कोलकाता : भारत-श्रीलंका यांच्यात कोलकाता येथे सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये चौथ्या दिवशी श्रीलंकेची पहिली इनिंग 294 रनवर ऑलआऊट झाली आहे.
भारतीय टीमने पहिली इनिंगमध्ये 172 रन केले होते. श्रीलंकेने 122 रनची लीड मिळवली आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि शमीने प्रत्येकी 4-4 विकेट घेतल्या.
श्रीलंकाकडून लाहिरू थिरिमान्नेने 5, एंजेलो मॅथ्यूजने 52 आणि हेराथने 67 रन केले.
भारताचा पहिला डाव - 172/10
श्रीलंकेचा पहला डाव - 294/10
लीड - 122 रन