मुंबई : न्यूझीलंडविरुद्धची सीरिज झाल्यानंतर श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. ३७ दिवसांच्या या दौऱ्यामध्ये श्रीलंका तीन टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच खेळणार आहे. १६ नोव्हेंबरपासून श्रीलंकेच्या या दौऱ्याला सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडसोबत भारताच्या तीन वनडे आणि तीन टी-20 मॅच असणार आहेत. ७ नोव्हेंबरला भारत आणि न्यूझीलंडमध्ये शेवटची टी-20 होईल. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजला सुरुवात होईल.


याआधी भारत जुलै आणि ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यावर भारतानं तीन टेस्ट, पाच वनडे आणि एक टी-20 अशा सगळ्या नऊ मॅच जिंकल्या होत्या.


श्रीलंकेविरुद्धच्या सीरिजचं वेळापत्रक


टेस्ट सीरिज


पहिली टेस्ट- १६-२० नोव्हेंबर- कोलकाता


दुसरी टेस्ट- २४-२८ नोव्हेंबर- नागपूर


तिसरी टेस्ट- २-६ डिसेंबर- दिल्ली


वनडे सीरिज


पहिली वनडे- १० डिसेंबर- धर्मशाला


दुसरी वनडे- १३ डिसेंबर- मोहाली


तिसरी वनडे- १७ डिसेंबर- विशाखापट्टणम


टी-20 सीरिज


पहिली टी-20- २० डिसेंबर- कटक


दुसरी टी-20- २२ डिसेंबर- इंदूर


तिसरी टी-20- २४ डिसेंबर- मुंबई