मुंबई : क्रिकेट खेळताना अनेकदा खेळाडूंना दुखापत होण्याच्या घटना घडल्याच्या आपण पाहिल्या असतील. मात्र या घटनेत एका खेळाडूला अचानक छातीत वेदना व्हायला लागली आणि तो मैदानात कोसळला.   घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवावा लागला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. आज दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात एक धक्कादायक घटना घडली. श्रीलंकेचा खेळाडू कुसल मेंडिसला फिल्डींग करताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले.  वेदनेने कळवळत मेंडिस छातीवर हात ठेवून ओरडताना दिसला.


मेंडिसला छातीत दुखू लागल्यावर लगेच फिजिओ मैदानावर आला. यावेळी तपासणी करताना त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने  मेंडिसला ढाका येथील रुग्णालयात नेण्यात आले आहे. बांगलादेशच्या डावाच्या 23व्या षटकात हा प्रकार घडला.



 डॉक्टर काय म्हणाले? 


बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे डॉक्टर मंजूर हुसेन चौधरी यांनी सांगितले की, कुशल मेंडिसला रुग्णालयात नेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सामन्यापूर्वी कुशलला डिहायड्रेशनचा त्रास होत होता, त्यामुळे ही समस्या त्याला उद्भवल्याचे त्यांनी म्हटले.मात्र  
रुग्णालयाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


कामगिरी 


27 वर्षीय कुशल मेंडिसने श्रीलंकेसाठी आतापर्यंत 49 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर 35 च्या सरासरीने 3 हजारांहून अधिक धावा आहेत. कुशल मेंडिसने 82 एकदिवसीय सामन्यांमध्ये 30 च्या सरासरीने 2300 धावा केल्या आहेत.