मुंबई: क्रिकेटच्या मैदानात जखमी होणं स्वाभाविक आहे. श्रेयस अय्यर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार यांसारखे खेळाडू मैदानात खेळाताना जखमी झाले आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर आता मैदानात पुन्हा उतरण्याची तयारी देखील करत आहेत. नुकतंच जोफ्रा आर्चरच्या हाताला दुसऱ्यांदा सर्जरी करावी लागली. मजेची गोष्ट म्हणजे ही दुखापत मैदानात नाही तर मैदानाबाहेर झाली होती. मात्र ती पुन्हा डोकं वर काढू लागल्यानं आता परत शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोफ्रा आर्चरच नाही तर असे आणखी 7 खेळाडू आहेत ज्यांनी मैदानात नाही तर मैदानाबाहेर स्वत:ला काहीतरी दुसरी गोष्ट करत असताना जखमी करून घेतलं आहे. आज अशा खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. 


इंग्लंडचा खेळाडू बेन फोक्स काउंटी चॅम्पियनशिपदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये सॉक्सवरून घसरल्यानं त्याला दुखापत झाली. त्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्यात बेन स्टोक्स खेळू शकणार नाही. आता भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजपर्यंत तो रिकव्हर होणार का याकडे लक्ष आहे. 


इंग्लंडचाच दुसरा खेळाडू म्हणजे जोफ्रा आर्चर. घराची साफसफाई करताना त्याच्या हातात काचेचा तुकडा जाऊन दुखापत झाली आणि शस्त्रक्रिया करून तो काढावा लागला. त्यानंतर पुन्हा एकदा कोपराला झालेली दुखापत त्रास देऊन लागल्यानं आता त्याच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.


जॉनी बेअरस्टो 2018 मध्ये वॉर्म करताना फुटबॉलच्या मैदानात जखमी झाला. फुटबॉल खेळतानाच झालेल्या  दुखापतीमुळे लिगामेंटमध्ये फ्रॅक्चर झालं. त्यामुळे बेन फोक्सला संघात एन्ट्री मिळाली होती.  


2014मध्ये लॉकर रूमला पंच मारत असताना बेन स्टोक्सच्या हाताला चांगलीच दुखापत झाली होती. वेस्ट इंडिज दौऱ्यादरम्यान झालेल्या या दुखापतीमुळे तो मैदानात फलंदाजी करू शकत नव्हता. 3 महिन्यांनंतर पुन्हा एकदा तो मैदानावर खेळण्यासाठी आला. 


जेसन रॉय 2018 मध्ये खेळत असताना पहिल्याच बॉलवर आऊट झाला आणि त्याने रागाने बॅट मैदानात फेकली. मात्र फेकण्याचा जोर एवढा जबरदस्त होता की बॅट उटलटी खाली आदळून त्याच्या तोंडावर आली आणि त्याला दुखापत झाली होती. 


भारत दौऱ्यावर असताना जॅक क्रॉली नावाच्या एका क्रिकेटपटूचा पाय मार्बलवरून घसरला आणि तो जखमी झाला. 2010मध्ये जेम्स एन्डरसन एशेज सीरिजआधी बॉक्सिग करताना बरगड्यांना दुखापत झाली.