मुंबई : कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी सरसकट गुगलकडे धाव घेण्याची अनेकांचीच सवय. गुगलला सगळ्यातलं सगळं ठाऊक आहे, असं अनेकजण मोठ्या विश्वासानं सांगतात. अर्थात या गोष्टीत सत्यताही आहे. पण, हेच गुगल जर चुकलं तर? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सध्या गुगल सर्चच्या या प्रकरणामुळं मुळचा अफगाणिस्तानचा असणारा आणि सध्या IPL 2020 आयपीएलच्या हंगामात हैदराबादच्या संघातून खेळणारा राशिद खान बराच चर्चेत आला आहे. किंबहुना अनेकजण गुगलसर्चमध्ये त्याचंच नाव सर्च करत आहेत. राशिदच्या खासगी आयुष्यावरही यानिमित्तानं प्रकाशझोत टाकला जात आहे. 


राशिदची पत्नी कोण, असं गुगलला विचारलं असता सर्च बारमध्ये तो अभिनेत्री अनुष्का शर्मा, म्हणजेर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या पत्नीचं नाव दाखवत आहे. ज्यामध्ये एका लहानश्या मथळ्याखाली राशिद खानच्या क्रिकेट कारकिर्दीची थोडक्यात माहितीसुद्धा देण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर, wife/spouse च्या भागातही अनुष्का शर्मा हिचं नाव दाखवण्यात येत आहे. 


 


गुगल अशी चुकीची माहिती का बरं दाखवत आहे, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? याचे धागेदोरे २०१८ मध्ये चाहत्यांशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून मारलेल्या संवादात सापडतात. त्यावेळी तुझी सर्वात आवडती बॉलिवूड अभिनेत्री कोण, असा प्रश्न राशिदला विचारण्यात आला होता. ज्याचं उत्तर देत त्यानं प्रिती झिंटा आणि अनुष्का शर्मा यांची नाव घेतली होती. तेव्हापासून गुगलवर हा ट्रेंड भलत्याच वाटेवर गेला आणि राशिदची पत्नी म्हणून थेट अनुष्काचं नाव दाखवू लागला.