मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. आज या सामन्याचा दुसरा दिवस होता. पावसामुळे हा सामना पुर्ण होऊ शकला नाही.मात्र या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या नावे एक लाजीरवाणा रेकॉर्ड झाला. दरम्यान एका ओव्हरमध्ये सर्वांधिक धावा देण्याचा कसोटी आणि टी-२० मध्ये लाजिरवाणा विक्रम स्टुअर्ट ब्रॉड या खेळाडूच्या नावे आहे.विशेष म्हणजे असा लाजिरवाणा रेकॉर्ड त्याच्या नावे येण्यास भारतीय खेळाडूचं जबाबदार आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये खेळवली जाणारी एजबॅस्टन कसोटी ऐतिहासिक ठरलीय. ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी धमाकेदार शतके ठोकली, पण यात भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराह भाव खाऊन गेला. भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात 35 धावा चोपल्या. त्यामुळे  स्टुअर्ट ब्रॉडचं कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महागडे षटक ठरलंय. 


कसोटीत 8 बॉल्सची ओव्हर
जसप्रीत बुमराह कसोटीमध्ये एका ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ठरलाय. यासह बुमराहने वर्ल्ड रेकॉर्ड केला. तसेच ब्रॉड कसोटीत क्रिकेटच्या इतिहासात एका ओव्हरमध्ये सर्वाधिक रन्स लुटवणारा गोलंदाज ठरला. ब्रॉडने या ओव्हरमध्ये एकूण 8 बॉल टाकले. ब्रॉडने नो आणि वाईड बॉल टाकल्याने त्याला 2 अतिरिक्त बॉल फेकावे लागले. या त्याच्या ओव्हरमध्ये बुमराहने 5 फोर 2 सिक्स आणि 1 धाव काढलीय.  



टी-20त लाजिरवाणा विक्रम
स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर टी-२० क्रिकेटमधील सर्वात महागडी ओव्हर टाकण्याचा विक्रम आहे. 2007 च्या T20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना झाला, तेव्हा युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात 6 षटकार ठोकले होते. षटकात प्रत्येक चेंडूवर षटकार लागणे फारच कमी आहे. युवराज सिंगने हा इतिहास रचला होता. त्यामुळे टी-20 त सर्वाधिक धावा देण्याचा विक्रम त्याच्या नावे झाला होता.  



दरम्यान जेव्हा-जेव्हा स्टुअर्ट ब्रॉड भारतासमोर आला आहे, तेव्हा तेव्हा त्याला भारतीय खेळाडूंनी चोपलं आहे.  ब्रॉड हा कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडा ओव्हर टाकणारा गोलंदाज ठरला आहे, याआधी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातही हा विक्रम त्याच्या नावावर आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाविरुद्ध असे दोन्ही वेळा घडले आहे.