मुंबई : रवी शास्त्री हा टीम इंडियाचा कोच होईल, असा विश्वास भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी व्यक्त केला आहे. टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी शास्त्रीनं अर्ज केला आहे. त्यानंतर रवी शास्त्रीच टीम इंडियाचा प्रशिक्षक होईल, असं बोललं जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१४ साली रवी शास्त्रीची टीम इंडियाचा डायरेक्टर म्हणून निवड करण्यात आली. रवी शास्त्री डायरेक्टर झाल्यानंतर भारतीय टीममध्ये हळू हळू बदल होत गेले आणि भारतीय क्रिकेटला चांगले दिवस आल्याचं सुनील गावसकर म्हणालेत. आता पुन्हा एकदा रवी शास्त्रीनं अर्ज भरल्यामुळे तोच प्रशिक्षकपदासाठी योग्य असल्याचं वक्तव्य गावसकर यांनी केलं आहे.


रवी शास्त्री २०१४ ते २०१६मध्ये टीम इंडियाचा डायरेक्टर होता. या काळामध्ये टीम इंडियानं इंग्लंडमध्ये वनडे सीरिज जिंकली. याचबरोबर वर्ल्डकप आणि टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलपर्यंत मजल मारली. रवी शास्त्री डायरेक्टर असताना टीम इंडियानं श्रीलंकेमध्ये टेस्ट सीरिज जिंकली. दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानात हरवलं आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी20 सीरीज जिंकली.


रवी शास्त्रीबरोबरच वीरेंद्र सेहवाग, टॉम मूडी, वेंकटेश प्रसाद, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत आणि फिल सिमन्स यांनीही टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केले आहेत.