मुंबई : टीम इंडियामध्ये सध्या आर अश्विनची खूप चर्चा आहे. त्याने जी कामगिरी केली आहे त्यामुळे संपूर्ण जगात त्याचं कौतुक होत आहे. रोहितनं दिलेल्या संधीमुळे आर अश्विननं मोठा विक्रम मोडला. त्यानंतर आता सुनील गावस्कर यांनी आर अश्विनबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर अश्विननं नुकताच कपिल देव यांचा रेकॉर्ड मोडला. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात त्याने सर्वाधिक विकेट्स घेत विक्रम मोडला आहे. एकाचवेळी चार खेळाडूंना मागे टाकून कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. आर अश्विनच्या नावावर 442 विकेट्स आहेत. 


आता आर अश्विनचं पुढचं लक्ष्य अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडण्याकडे असणार आहे. सुनील गावस्कर यांनी अश्विनबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. 35 वर्षांचा अश्विन सध्या भारतीय कसोटी गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर लेग स्पिनर अनिल कुंबळे आहेत. 


आर अश्विन दिवसेंदिवस अधिक उत्तम पद्धतीनं खेळत आहे. त्यामुळे तो लवकरच अनिल कुंबळे यांचा विक्रम मोडेल असा विश्वास सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात आर अश्विननं सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्यानंतर जडेजानं 10 विकेट्स घेतल्या आहेत. 


अनिल कुंबळे यांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अश्विननला 177 विकेट्स अजून घेणं बाकी आहे. आतापर्यंत त्याने 86 कसोटी सामने खेळून 442 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर वन डे सामन्यात 151 तर टी 20 मध्ये 61 विकेट्स आहेत.