India vs England 2nd Test: विशाखापट्टणममध्ये भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये दुसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. 5 सामन्यांच्या या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडकडे 1-0 अशी आघाडी आहे. तर आता दुसरा सामना सुरु असून एसीए-वीडीसीए स्टेडियमवर पहिल्या दिवशी भारताचं वर्चस्व दिसून आलं. दरम्यान या सामन्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे प्रेक्षक मात्र फारच हैराण झाले आहेत. झालं असं की, या सामन्याच्या पहिल्या दिवशी सुनिल गावस्कर कॉमेंट्री करताना अचानक निघून गेले . 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर या सामन्यात कॉमेंट्री करत होते, पण अचानक त्यांना एक दुःखद बातमी समजली. यामुळे सुनील गावस्कर यांना अचानक लाईव्ह कॉमेंट्री सोडावी लागली. यानंतर सुनील गावस्कर शुक्रवारी दुपारी विशाखापट्टणमहून कानपूरला गेले.


लाईव्ह कॉमेंट्री सोडून का निघून गेले गावस्कर?


भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या सासूबाईंचं निधन झाल्याची बातमी त्यांना मिळाली. ही बातमी मिळाल्यानंतर सुनील गावस्कर यांनी विशाखापट्टणममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान कॉमेंट्री सोडून थेट कानपूर गाठलं. सुनील गावस्कर शुक्रवारी दुपारी पत्नी मार्शनील गावस्कर आणि कुटुंबासह कानपूरला रवाना झाले. 


सामन्याचा पहिला दिवस भारताच्या नावे


भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच टेस्ट सामन्यांच्या सिरीजमधील दुसरा टेस्ट सामना विशाखापट्टणमध्ये (Visakhapatnam) खेळवला जातोय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit) टॉस जिंकत पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यावेळी ओपनिंगला आलेल्या यशस्वी जयस्वालने सामन्याच्या पहिल्याच दिवशी तुफानी खेळी केली. पहिल्या दिवसाच्या अखेरीस टीम इंडियाने 6 बाद 336 धावांपर्यंक मजल मारली.


रोहित-गिल पुन्हा ठरले फेल


टीम इंडियाचा डाव यशस्वी जयस्वालने सावरला. या सामन्यातही टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) पुन्हा एकदा फ्लॉप ठरले.  रोहित शर्मा केवळ 14 धावा करुन बाद झाला. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला शुभमन गिल 34 धावा करुन बाद झाला. इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडकरसनने त्याला पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही रोहित आणि शुभमन फ्लॉप ठरल्याचं दिसून आलं.