मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यानंतर आता गावस्कर यांना आयपीएलच्या कॉमेंट्रीमधून हटवण्याची मागणी होतेय. राजस्थान रॉयल्सचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरच्या पत्नीबद्दल अयोग्य कमेंट केल्याबद्दल गावसकर यांच्यावर टीका करण्यात येतेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएल 2022 मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामना सुरु होता. या सामन्यात वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर फलंदाजीसाठी क्रीझवर आला. हेटमायर क्रीझवर येताच गावस्कर यांनी तो आणि त्याच्या पत्नीवर अयोग्य कमेंट केल्याचं म्हणणं आहे.


हेटमायरने पहिल्या मुलाच्या जन्मामुळे राजस्थानसाठी काही सामने गमावलेत. मात्र चेन्नईविरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये कमबॅक केलं. राजस्थानच्या डावाच्या 15व्या ओव्हरमध्ये हेटमायर फलंदाजीला आला. 


जेव्हा हेटमायर फलंदाजीसाठी मैदानात यावेळी गावस्कर इंग्रजीमधून कॉमेंट्री करत होते. हेटमायर क्रीजवर येताच गावस्कर यांनी म्हणाले, 'शिमरॉन हेटमायरच्या पत्नीची डिलीव्हरी झाली आहे. तर आता हेटमायर राजस्थानसाठी डिलिव्हरी करणार का?


गावस्कर यांच्या या वक्तव्यानंतर चाहते आता सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका करतायत. यावेळी काही युझर्सने त्यांना कॉमेंट्रीमधून काढून टाकण्याची मागणीही करत आहेत. गावस्कर यांनी यापूर्वी आयपीएल 2020 मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्माबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतरही त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती.