मुंबई : लिटील मास्टर सुनिल गावस्कर यांचे केवळ भारतातच नाहीत तर संपूर्ण जगात त्यांचे चाहते आहेत. अनेकदा तरूण खेळाडूंविषयी गावस्कर त्यांची परखड मतं मांडत असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे गावस्कर काही वेळा सोशल मीडियावर ट्रोलंही होतात. मात्र यावेळी गावस्कर ट्रोल झालेत ते एका वेगळ्याच कारणाने.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीयो व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीयोमध्ये एका चाहतीच्या आग्रहाखातर सुनील गावस्कर तिला तिच्या कपड्यांवर सही देण्यासाठी तयार होतात. यावेळेस पहिल्यांदा ते तरुणीच्या खांद्याजवळ सही करण्यास जातात. मात्र नंतर तिच्या हातावर ते सही करण्यास तयार होतात. ते तिच्या खांद्यावर सही करतात. 


यावेळी ती चाहती कपड्यांवर गावस्करांची ऑटोग्राफ मिळाल्याने फार खूश होताना दिसतेय. हा व्हिडीओ एखाद्या इव्हेंटमधला असल्याचा दिसतोय. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ADULTGRAM  (@_adultgram_)


परंतू गावस्कर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या. या प्रतिक्रियांमध्ये बहुतांश प्रतिक्रिया या गावस्करांना ट्रोल करणाऱ्या होत्या. एका तरुणीच्या खांद्यावर सही केल्याचे काही नेटकऱ्यांनी पटलेले दिसत नाही. काहींनी गावस्करांच्या समर्थनात प्रतिक्रिया नोंदवल्या. 



गावस्करांच्या नावाने स्टेडियम


नुकतंच सुनील गावस्कर यांना एक मोठा सन्मान मिळाला आहे. इंग्लंडमधील एका स्टेडियमचं नाव बदलून सुनील गावस्कर करण्यात आलंय. 23 जुलै रोजी लिसेस्टर क्रिकेट मैदानावर झालेल्या समारंभात या स्टेडियमला ​​नवीन नाव देण्यात आलं. इंग्लंडमधील क्रिकेट स्टेडियमला ​​भारतीय क्रिकेटपटूचं नाव देण्याची ही पहिलीच वेळ आहे.