SRH vs PBKS : शिखरच्या झुंजार खेळीसमोर हैदराबादचा सन`राईज`; पंजाबचा 8 विकेट्सने पराभव!
या सामन्यात राहुल त्रिपाठीने राहुल त्रिपाठी 74 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने त्याचं अर्धशतक अवघ्या 35 बॉल्समध्ये पूर्ण केलं. त्याच्या खेळीच्या जोरावर हैदराबाद टीमने हा सामना 8 गडी राखून सहज जिंकला.
SRH vs PBKS : आयपीएलमध्ये आज 14 वा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यामध्ये रंगला होता. या सामन्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने विजय मिळवला आहे. हैदराबादने पंजाबचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला. यंदाच्या सिझनमधील हैदराबादचा हा पहिला विजय मिळवलाय. यापूर्वीचे दोन्ही सामने सनरायझर्स हैदराबादच्या टीमने गमावले होते. तर दुसरीकडे शिखर धवनच्या पंजाब किंग्सचा हा पहिलाच पराभव होता.
हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने आजच्या सामन्यामध्ये टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय टीमसाठी फायदेशीर ठरला. पंजाबने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत 143 रन्स केले. तर सनरायझर्स टीमने 17.1 ओव्हर्समध्ये 2 विकेट्स गमावत 145 रन्स करत सामना जिंकला. या विजयाने मालकीण काव्या मारनच्या चेहऱ्यावर हसू उमटलं
पंजाबकडून 144 रन्सचं आव्हान
प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादसमोर 144 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. पंजाबचा कर्णधार शिखर धवनच्या नाबाद 99 रन्सच्या जोरावर पंजाबने नऊ विकेट्स गमावून 143 रन्स केले. धवनशिवाय फक्त सॅम करनला दुहेरी आकडा गाठता आला. सॅम करणने 22 रन्सची खेळी केली.
हैदराबादकडून मयंक मार्कंडेने 4, उमरान मलिक आणि मार्को जॅनसेन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतले. या सामन्यात कर्णधार धवनचे शतक हुकलं पण त्याच्या नाबाद 99 रन्सच्या खेळीमुळे पंजाब किंग्जला 143 रन्सपर्यंत मजल मारता आली.
राहुल त्रिपाठीची झुंझार खेळी
पंजाबने दिलेल्या 144 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादच्या टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. चौथ्या ओव्हरमध्ये 13 रन्सवर हॅरी ब्रूक पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवाय मयंक अग्रवालही 21 रन्सवर आऊट झाला. मात्र त्यानंतर कर्णधार एडम मारक्रम आणि राहुल त्रिपाठी यांच्या पार्टनरशिपच्या जोरावर हैदराबादच्या टीमने पहिला विजयाचा पाया रचला.
या सामन्यात राहुल त्रिपाठीने राहुल त्रिपाठी 74 रन्सची खेळी केली. यावेळी त्याने त्याचं अर्धशतक अवघ्या 35 बॉल्समध्ये पूर्ण केलं. त्याच्या खेळीच्या जोरावर हैदराबाद टीमने हा सामना 8 गडी राखून सहज जिंकला.