लंकेच्या लकमलपुढे भारतीय खेळाडूंचं लोटांगण
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये सुरुवात झाली आहे.
कोलकाता : श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टला कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानामध्ये सुरुवात झाली आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या दिवशी फक्त ११.५ ओव्हरचाच खेळ झाला. यामध्ये भारतानं ३ विकेट गमावून १७ रन्स केल्या आहेत. भारताला हे तिन्ही धक्के सुरुंगा लकमलनं दिले. लकमलनं त्याच्या सहा ओव्हरमध्ये एकही रन न देता भारताच्या तिन्ही बॅट्समनना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. लकमलनं ६ ओव्हरमध्ये ६ मेडन ओव्हर टाकून ३ विकेट घेतल्या.
या मॅचमध्ये टॉस जिंकून श्रीलंकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, आणि लकमलनं मॅचच्या पहिल्याच बॉलला राहुलला माघारी पाठवलं. यानंतर लगेचच शिखर धवन ८ रन्सवर आणि विराट कोहली शून्य रनवर आऊट झाला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा चेतेश्वर पुजारा नाबाद ८ आणि अजिंक्य रहाणे नाबाद शून्य रनवर खेळत होता.
भारतीय संघ : के.एल. राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव