मुंबई : दुखापतीमुळे चेन्नईचा फलंदाज सुरेश रैना सामन्यात खेळू शकणार नाहीये. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला थोडा वेळ लागणार आहे. मात्र त्याला साथ दिलीये ती दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जाँटी ऱ्होडसने. जाँटी ऱ्होडसने ट्वीट करताना सुरेश रैनाच्या तब्येतीबाबत आशा व्यक्त केलीये. मला आशा आहे की तुझी दुखापत लवकर बरी होईल छोट्या भावा. तुला मैदानावर पाहण्यासाठी मी उत्सुक आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाँटी ऱ्होडसच्या ट्वीटनंतर सुरेश रैनाने याला उत्तर देताना भावनिक ट्वीट केलेय. रैना म्हणाला, हा भाऊ आधीपेक्षा आता खूप बरे वाटतेय. आज सराव करण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला या स्पर्धेत मिस करतोय. 



सुरेश रैनाचे स्नायू खेचले गेल्याने तो संघाबाहेर आहे. रैनाच्या अनुपस्थिती पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात चेन्नईला पराभवास सामोरे जावे लागले. रैनाला कोलकाताविरुद्धच्या सामन्यात सुनील नरेनच्या बॉलवर धाव घेताना स्नायू ताणले गेल्याने दुखापत झाली होती.