मुंबई : सुरेश रैना यंदाच्या हंगामात अनसोल्ड राहिला. त्याला चेन्नई संघाने रिटेन केलं नाही. इतकच नाही तर इतर कोणत्याही संघांनी त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे सुरेश रैना अनसोल्ड राहिला. मात्र सुरेश रैना आयपीएलमध्ये कॉमेंट्री करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहे. त्याआधी चेन्नई संघातून एक मोठी बातमी येत आहे. सुरेश रैनानं वर्तवलेलं भाकीत अखेर खरं ठरलं आहे. महेंद्रसिंह धोनीनं कर्णधारपद सोडण्याची आज घोषणा केली.


सुरेश रैनानं चेन्नईचं कर्णधारपद धोनीनं सोडल्यानंतर पुढचा कर्णधार कोण होणार याचं भाकीत वर्तवलं होतं. चार वेळा आयपीएलची ट्रॉफी मिळवणाऱ्या चेन्नईचा उत्तराधिकारी कोण असणार हे रैनानं सांगितलं होतं. 


तेव्हा सुरेश रैनानं रवींद्र जडेजाकडे नेतृत्व करण्याची ताकद आहे असं सांगितलं होतं. त्यासोबत अंबाती रायडूचंही नाव चर्चेत असल्याचं सांगितलं होतं. सुरेश रैनानं वर्तवलेलं भाकीत खरं ठरलं आणि रैनाकडे कमान गेली. 


सुरेश रैनानं रविंद्र जडेजाला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. रविंद्र जडेजा चेन्नईचा नवा कर्णधार असणार आहे. 15 व्या हंगामात जडेजा कर्णधारपद सांभाळणार आहे. 


कमेंट्रीबाबक काय म्हणाला रैना?
आयपीएलमध्ये कमेंट्री करणं माझ्यासाठी खूप जास्त कठीण आहे. पण मी यासाठी तयार आहे. माझे काही मित्र इरफान पठाण, हरभजन सिंग आणि पियुष चावला आधीच कॉमेंट्री करत आहेत. मी यांच्याकडून नक्की सूचना आणि मदत घेईन असंही त्याने म्हटलं आहे.