नवी दिल्ली : IPL 2020 चेन्नई सुपर किंग्ज  (Chennai Super Kings)  संघाला आणखी एक धक्का बसला आहे. CSKचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना  (Suresh Raina) त्याच्या वैयक्तिक कारणामुळे यूएईमधून भारतात परतला आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी संघ यूएईमध्ये दाखल झाले आहेत. मात्र रैना मायदेशी परतला असून यामागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. चेन्नई सुपर किंग्जने ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरेश रैना आयपीएलच्या संपूर्ण सीजनमधून बाहेर झाला आहे. एक दिवस आधी चेन्नईच्या टीममधील 13 जणांना कोरोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दुबईमध्ये पोहोचल्यानंतर चेन्नईच्या टीमची कोरोना चाचणी करण्यात आली. यात 13 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. कोरोना झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती आहे.


रैनाने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्री क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याची घोषणा केली होती. रैनाच्या निवृत्तीची घोषणा अनेक चाहत्यांसाठी मोठा धक्का होता. त्यानंतर आता रैना आयपीएलमधूनही बाहेर झाल्याने चाहत्यांसाठी हा आणखी एक धक्का असणार आहे.